Virat Kohli And Gautam Gambhir Fight : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळं क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही दोन्ही खेळाडूंवर सडकून टीका केली होती. दोघांनाही कठोर शिक्षा दिली पाहिजे, असं गावसकर यांनी म्हटलं होतं. अशातच आता माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने दोघांवरही बंदी घालण्याबाबत म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना सेहवागने दोघांनाही फटकारलं आहे. माझी मुलंही सामना पाहतात आणि ‘बेन स्टोक्स’चा अर्थ त्यांना समजतो, अशा शब्दात सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

सेहवागने म्हटलं की, “सामना संपल्यानंतर मी टीव्ही बंद केला. सामना झाल्यावर नेमकं काय घडंल, याबाबत मला कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी मी पाहिलं की, सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा रंगली होती. जे काही झालं ते योग्य नव्हतं. पराभव झालेल्या संघानी शांतपणे तो स्विकारला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आणि जिंकणाऱ्या संघाने आनंद साजरा केला पाहिजे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

नक्की वाचा – Suryakumar Yadav Latest News : मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनेही चौकार षटकारांचा पाऊस पाडला.

” त्यांना एकमेकांना सांगण्याची गरज का पडली…मी नेहमी एक गोष्ट सांगतो की, ही माणसं देशाचे आयकॉन आहेत. ते जे काही करतात किंवा सांगतात, त्या गोष्टींना लाखो मुलं फॉलो करतात. जर माझ्या आयकॉनने असं केलं आहे, तर मी पण असंच करणार, अशाप्रकारचा विचार ते करतात. खेळाडूंनी या गोष्टींची काळजी घेतली तर मैदानात अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत. बीसीसीआय एखाद्यावर बंदी घालण्याबाबत निर्णय घेत असेल, तर कदाचित अशाप्रकारच्या घटना समोर येणार नाहीत. अशाप्रकारच्या घटना अनेकदरा घडल्या आहेत. पण ड्रेसिंग रुममध्ये जे काही करायचं आहे ते करा, हेच चांगलं ठरू शकतं.”, असंही सेहवागने माध्यमांशी बोलताना म्हटलं.

Story img Loader