Virendra Sehwag Statement on Rohit Sharma: मुंबई इंडियन्स आज आयपीएल २०२४ मधील शेवटचा सामना खेळत आहे. हा हंगाम मुंबईसाठी खूपच खराब राहिला. या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबईाच संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा संघ ठरला. यंदाच्या मोसमातील संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांची कामगिरीही काही विशेष राहिलेली नाही. रोहितने या हंगामात काही प्रसंगी धावा केल्या असल्या तरी हार्दिकने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत निराश केले आहे. आता टीम इंडियाचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यांनी रोहित आणि हार्दिकबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

IPL 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पाड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खराब राहिली. हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. मुंबईच्या शेवटच्या सामन्यापूर्वी क्रिकबझशी बोलताना सेहवागने थेट बॉलीवू़डचे उदाहरण देत मोठे वक्तव्य केले.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

हेही वाचा – IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

वीरेंद्र सेहवाग मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर भडकला

सेहवाग म्हणाला, “शाहरूख खान, आमिर खान, सलमान खान हे तिन्ही सुपरस्टार एकाच चित्रपटात असतील तर तो चित्रपट हिट ठरेल हे कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी चांगलं काम करावं लागेल. बरोबर? त्यासाठी चित्रपटाची स्क्रिप्टही चांगली हवी. त्याचप्रमाणे या संघातील सर्व मोठ्या खेळाडूंना एकत्र येऊन चांगली कामगिरी करावी लागेल. रोहित शर्माने एक शतक झळकावले पण तोही सामना मुंबई इंडियन्सने गमावला होता. मग इतर सामन्यातील कामगिरी कुठेय?”

पुढे सेहवाग म्हणाला, “इशान किशन यंदाचा संपूर्ण हंगाम खेळला पण तो एकदाही पॉवरप्लेच्या पुढची षटके खेळू शकला नाही. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्ससाठी दोनच नाव महत्त्वाची आहेत, ती म्हणजे जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव. मुंबईसाठी रिटेन करण्याच्या यादीतील ही दोन आघाडीची नावे आहेत. “

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

मनोज तिवारीचे रोहित शर्मावर मोठे वक्तव्य

सेहवागनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारीने ही मुंबईच्या खेळाडूंवर वक्तव्य करत सांगितले, “माझ्या मते, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे दोन खेळाडू आहेत ज्यांना मुंबई इंडियन्स आयपीएल मेगा लिलाव २०२५ मध्ये रिटेन करू शकतात. यापलीकडे कोणीही नाही आणि कोणताच विदेशी खेळाडूसुध्दा नाही. मुंबई इंडियन्सनने बुमराह आणि सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवावे आणि पुढील हंगामात या दोघांपैकी एकाला संघाचा कर्णधार करावे. माझ्यामते रोहितलाही रिटेन करू नये, कारण त्याच्या कामगिरीकडे पाहता त्याला मुंबईने पुढील हंगामासाठी रिटेन करू नये अशी त्याची इच्छा आहे.”

Story img Loader