Wanindu Hasaranga out of IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलच्या १७ व्या मोसमात स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे, जो डाव्या टाचेच्या दुखापतीमुळे आतापर्यंत संघात सामील होऊ शकला नाही. हसरंगाबाबत, श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे की, तो आयपीएलच्या या संपूर्ण हंगामातून बाहेर राहील. हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण हसरंगा हा संघाच्या रणनीतीचा एक मोठा भाग होता, जो गोलंदाजीसह फलंदाजीतही संघासाठी योगदान देण्यासाठी समर्थ होता.

विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून घेतला निर्णय –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ आयपीएलच्या १७ व्या हंगामाच्या समाप्तीनंतर सुरू होणार आहे. हा विश्वचषक जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत हसरंगाला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी श्रीलंका क्रिकेटने हा निर्णय घेतला आहे. ‘संडे टाइम्स’ला दिलेल्या निवेदनात श्रीलंका क्रिकेटच्या सीईओने सांगितले की, हसरंगाच्या टाचेला सूज आली होती आणि इंजेक्शन घेतल्यानंतर तो खेळत होता. त्यामुळेच त्याने विश्वचषकापूर्वी आपली समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आणि तो यंदाच्या आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही, अशी माहिती दिली. आता वानिंदू हसरंगा दुबईला त्याची टाच दाखवण्यासाठी जाणार असून, जिथे तो तज्ञांचे मत जाणून घेणार आहे.

Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
Why Dispute in MVA?
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत? महापालिका निवडणुकांच्या आधीच उभा दावा ?
kalyan Police sent Vishal Gawlis mobile to forensic lab
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळीचा, मोबाईल तपासणीसाठी फाॅरेन्सिक प्रयोगशाळेकडे

सनरायझर्स हैदराबादने हसरंगाला १.५० कोटींमध्ये घेतले होते –

श्रीलंकेच्या टी-२० संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा या आयपीएल हंगामातील खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचा एक भाग होता, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला १ कोटी ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात सामील केले होते. मागील दोन मोसमात, हसरंगा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळला होता, ज्यामध्ये त्याची चेंडूसह उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. हसरंगाच्या जागी सनरायझर्स हैदराबाद बदली खेळाडूचे नाव कधी जाहीर करणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा – LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

हसरंगाची उणीव भासणार –

सनरायझर्स हैदराबादसाठी ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने मागील सामन्यात संस्मरणीय पदार्पण केले. गेल्या सामन्यात त्याने सनरायझर्ससाठी १८ चेंडूत जलद अर्धशतक झळकावले होते. तथापि, अनकॅप्ड भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा त्याला मागे टाकत अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले. तसेच हेनरिक क्लासेने नाबाद ८० धावा केल्या होत्या. ज्यामुळे हैदराबादने सर्वाधिक धावंसख्येचा विक्रम मोडला. हैदराबादने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एक जिंकला आणि एक गमावला. संघाची फलंदाजी मजबूत असून गोलंदाजीची चिंता आहे. त्यामुळे हसरंगाची उणीव त्यांनी नक्कीच भासेल.

Story img Loader