MS Dhoni IPL Farewell: शहर बदलले, चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिस्पर्धी बदलले, पण एमएस धोनीचा सूर मात्र बदलला नाही. २३ एप्रिलच्या संध्याकाळी, कोलकात्यात निवृत्ती संदर्भात जे बोलला तेच २१ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बोलले होता. ‘ईडन गार्डन्सच्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. ते सर्वजण मला निरोप द्यायला आले होते.’… हे शब्द होते महेंद्रसिंग धोनीचे आयपीएलच्या १६व्या मोसमात काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर. कोलकात्यातील हे ऐतिहासिक मैदान त्याच्या स्थानिक संघ कोलकाता आणि महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा देण्यासाठी खचाखच भरले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने या मैदानावर सर्वात मोठी टी२० धावसंख्या म्हणजेच २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ आठ गडी गमावून १८८ धावांवर गडगडला आणि विजयापासून ४९ धावा दूर राहिला.

सामना संपल्यानंतर मैदानावर पोहोचलेले चाहते पुरस्कार सोहळ्यात धोनीचा आवाज ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबले. माहीने चाहत्यांचे आभार मानले आणि हातवारे करत सांगितले की, “आता एक खेळाडू म्हणून तो या मैदानावर पुढचा सामना खेळू शकणार नाही अर्थात त्याची आयपीएल निवृत्ती लवकरच होणार आहे. आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच अनेक दिग्गजांना विश्वास होता की धोनीची ही शेवटची आयपीएल असेल. आता खुद्द धोनीनेही हा त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे मान्य केले आहे. केकेआरच्या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, “कोलकाताचे प्रेक्षक मला फेअरवेल देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याबद्दल त्यांचे आभार.”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

सामन्यानंतर धोनी पुढे म्हणाला, “होय, वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू त्यांचे काम चोख बजावत आहेत. आम्ही नेहमी विरोधी संघांवर दबाव आणतो आणि जर तुम्ही त्यांच्या फलंदाजीचा क्रम बघितला तर त्यांना खालच्या ऑर्डरमध्ये मोठे हिटर मिळाले आहेत आणि आम्ही त्याचा आदर करतो. मात्र एवढी असूनही आम्ही त्यांना रोखण्यात यशस्वी झालोत.”

जेव्हा बेन स्टोक्स आणि दीपक चहरसारखे महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त होतात तेव्हा तो म्हणतो, “माझा फंडा साधा आणि सरळ आहे जो जखमी आहे तो काहीही करू शकत नाही. मी पाहतो की कोण चांगले तयार आहे आणि संघाला विजयी कोण करू शकतो? त्यावरून त्यांना मी संधी देतो आणि अधिक चांगला खेळ उंचावण्याची प्रेरणा देतो. एवढेच विचार माझ्या सुरु असतात, मला आशा आहे की ते पुढे असेच चालू राहील.”

हेही वाचा: Sachin Tendulkar Birthday: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान!’ सचिन, सचिन… साडेपाच फुटाचा मुलगा कसा बनला ‘क्रिकेटचा देव’, जाणून घ्या

चांगली सुरुवात न केल्यामुळे एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नव्हते, अशी कबुली नाइट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा याने दिली. राणा म्हणाला, “आमची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप कमी धावा केल्या आणि पॉवरप्लेमध्ये इतक्या कमी धावा केल्यानंतर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही. अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा शानदार खेळी केली. राणा पुढे म्हणाला की, “त्यांची टीम आपल्या चुकांमधून धडा घेत नाही आणि सतत चुका करत आहे. एवढ्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये आम्ही संघांविरुद्ध त्याच चुकांची पुनरावृत्ती करत आहोत जी समस्या आहे. स्पर्धेतील आमची कामगिरी सुधारत नाही. या खेळपट्टीवर २३५ धावा झाल्या हे पचवणे कठीण आहे.

Story img Loader