Washington Sundar Takes 3 Wickets In A Over : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३४ वा सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सुरुवातीलाच दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये दिल्लीच्या दोन फलंदाजांना स्वस्तात माघारी परतावं लागलं. फिलीप सॉल्टला भुवनेश्वर कुमारने शून्यावर बाद केलं.

त्यानंतर दिल्लीचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. कर्णधार डेविड वार्नर, सर्फराज खान आणि अमन खान वॉशिंग्टन सुंदरने बाद केलं अन् दिल्लीची फलंदाजी गडगडली. वॉशिंग्टनच्या या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ इंडिनय प्रीमियर लीगच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Virat Kohli and Yashavi Jaiswal dominated Australian newspaper front pages
Virat Kohli : ‘नव्या युगाचा मुकाबला…’, विराट-यशस्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्याने चाहत्यांचे वेधले लक्ष, PHOTOS व्हायरल

नक्की वाचा – Video: ‘स्ट्रॅटजिक टाईम आऊट’चा झाला गोंधळ! संजू सॅमसन थेट अंपायरशी भिडला, कोच संगकाराने केलं असं काही…

इथे पाहा व्हिडीओ

सनरायझर्स हैद्राबादकचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करून दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला. सुंदरने डेविड वार्नरला २१ धावांवर असताना बाद केलं. त्यानंतर लगेच सर्फराज खान सुंदरच्या गोलंदाजीचा शिकार झाला. सर्फराझ ९ धावा करून तंबुत परतला. त्यानंतर अमन खानलाही ४ धावांवर बाद करण्यात सुंदरला यश आलं. एकाच षटकात तीन फलंदाज बाद झाल्याने दिल्लीची धावसंख्या मंदावली.

अक्षर पटेलने ३४ चेंडूत ३४ धावा तर मनिष पांडेने २७ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली.त्यानंतर अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांनी सावध खेळी करत दिल्लीच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. सनरायझर्ससाठी वॉशिंग्टन सुंदरने ४ षटकात २८ धावा देत ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारनेही तीन विकेटस् घेतल्या तर नटराजनला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.