Anuj Rawat Run Out Shimron Hetmyer Video Viral : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ६० वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी धमाका केला. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डुप्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. पण अनुज रावतने शेवटच्या टप्प्यात धडाकेबाज फलंदाजी करून ११ चेंडूत २९ धावा कुटल्या आणि आरसीबीनं १७१ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांचा आरसीबीच्या गोलंदाजांनी पार धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थानचा आख्खा संघ अवघ्या ५९ धावांवर गारद करून आरसीबीने या सामन्यात ११२ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, तो म्हणजे अनुज रावतने केलेला शिमरन हेटमायरचा रनआऊट. रावतने महेंद्रसिंग धोनी स्टाईलने विकेटकिपींग करून षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या हेटमायरला ३५ धावांवर बाद केलं अन् आरसीबीचा विजय निश्चित केला. रावतच्या विकेटकिपींगचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – IPL 2023 RCB v RR : पार्नेल-सिराज चमकले! घरेलू मैदानात ५९ धावांवर राजस्थानचा आख्खा संघ गारद, RCB चा ११२ धावांनी दणदणीत विजय

इथे पाहा व्हिडीओ

आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात राजस्थानचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वालला शून्यावर बाद केलं. त्यानंतर पार्नेलच्या गोलंदाजीवर जॉस बटलरही शून्य धावांवर झेलबाद झाला. राजस्थानची खराब सुरुवात झाल्यानंतरही कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि पार्नेलच्याच गोलंदाजीवर तो ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटलाही पार्नेलने १० धावांवर बाद केलं आणि आरसीबीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. शिमरन हेटमायरने १९ चेंडूत ३५ धावा कुटल्या. पण तो मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर झुरेल, आश्विन, झॅम्पा, संदीप शर्मा आणि आसिफही स्वस्तात माघारी परतले आणि राजस्थानचा संपूर्ण संघ गारद झाला. पार्नेलने ३ विकेट घेतल्या. तर ब्रेसवेल आणि कर्ण शर्माला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.