Virat Kohli Blindfold Challenge with Sunil Chhetri Video Viral: विराट कोहली आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने विराट कोहलीला आव्हान दिले आहे. या चॅलेंजनुसार विराट कोहलीला डोळ्यावर पट्टी बांधून संघातील खेळाडूंना ओळखावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली डोळ्यावर पट्टी बांधून सहकारी खेळाडूंची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाप्रकारे विराट कोहलीने डोळ्यावर काळी पट्टी बांधून सहकारी खेळाडूंना ओळखले

खरं तर, विराट कोहलीचा एक नवीन व्हिडिओ आरसीबीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिसत आहे, ज्यामध्ये कोहली डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या सहकारी खेळाडूंना ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ मोहालीत पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयानंतरचा आहे. माहितीसाठी की विराटने ब्लाइंड फोल्ड गेम आंधळी कोशिंबीरमध्ये चॅलेंज स्वीकारत सर्वप्रथम दिनेश कार्तिकला त्याच्या दाढीने ओळखले. यानंतर मोहम्मद सिराजची त्याच्या घड्याळावरून ओळख पटली. यानंतर फाफला स्पर्श केल्यानंतर कोहलीने डाव्या हातात घड्याळ नसल्याचे सांगितले आणि उजव्या हातातील घड्याळ आणि टॅटूने स्पर्श करत त्याला ओळखले.

शेवटी विराट एका अशा व्यक्तीसमोर आला ज्याचा क्रिकेटशी अजिबात संबंध नाही. पण, कोहलीने या व्यक्तीला आधी स्पर्श केला आणि सांगितले की, हे मूल कोण आहे, फक्त उंची मोजा. त्याचे केस खूप कडक आहेत आणि तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. यानंतर तो म्हणाला की, हा माणूस चेंडू धरून आला होता, हा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आहे.” सुनील छेत्री त्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी आला होता. आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे.

सामन्यात काय झाले?

पंजाबविरुद्धच्या सामन्यात दोन्ही संघांना आपल्या नियमित कर्णधारांशिवाय मैदानात उतरावे लागले. नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात नेतृत्व करत असलेल्या विराट कोहलीने नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यासह आरसीबीला दमदार शतकी सलामी दिली. विराटने ५९ धावांची खेळी केली. तर, प्लेसिसने ८४ धावा कुटल्या. या दोघांनी १३७ धावा पहिल्या विकेटसाठी जोडल्या. त्यानंतर इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू न शकल्याने आरसीबीचा डाव १७४ पर्यंत मर्यादित राहिला.

हेही वाचा: LSG vs GT Score: हातातोंडाशी आलेला घास गुजरातने हिरावला! लखनऊवर सात धावांनी केली मात, मोहित शर्मा ठरला हिरो

या धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर त्यांना पहिला धक्का बसला. पॉवर प्लेमध्ये पंजाबने ४९ धावा करताना चार बळी गमावले होते. मधली फळी अपयशी ठरत असताना प्रभसिमरनने ४६ धावांची खेळी केली. अखेरीस जितेश शर्मा याने पंजाबच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केला. त्याने ४१ धावा केल्या. आरसीबीसाठी सिराजने सर्वाधिक चार बळी मिळवले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch despite having blindfold on eyes virat kohli perfectly finds sunil chhetri avw