Hardik Pandya On MS Dhoni : आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. आयरपीएलच्या इतिहासात आतापर्यंत गुजरात आणि सीएसके यांच्यात एकूण तीन सामने झाले आहेत. यामध्ये तिन्ही सामन्यात गुजरातच्या संघानं विजय मिळवला आहे. परंतु, सीएसकेचा संघ आज गुजरातचा पराभव करून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतील. हार्दिक पांड्या आणि एम एस धोनीची मैत्री सर्वश्रूत आहे. अशातच सीएसकेविरोधात होणाऱ्या सामन्याआधी धोनीचा समीकरण कसा आहे, यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातचा कर्णधार पांड्याने धोनीबाबत मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हार्दिक पांड्या म्हणाला, धोनी खूप शांत आहे, असं सर्वांनाच वाटतं. पण मी त्यांच्यासोबत नेहमी मजेशीर गप्पा मारतो. मी त्यांना ‘द महेंद्रसिंग धोनी’ म्हणून पाहत नाही. मी माहीला एक मित्र, मोठा भाऊ मानतो. धोनी एक महान क्रिकेटर आहे, यात काही शंका नाही. मी धोनीकडून खूप काही शिकलो आहे. धोनीकडून खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

नक्की वाचा – Video: मुंबई इंडियन्सचा ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश होताच सूर्या-रोहितनं धरला ठेका, स्टार खेळाडूंचा आवाज ऐकून हसू आवरणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

हार्दिक पुढं म्हणाला, “धोनीला खेळताना पाहून मी अनेक गोष्टी शिकल्या आहेत. माझ्यासाठी माही माझा भाऊ आहे. एक मित्र आहे. ज्याच्यासोबत मी प्रॅंक करून मस्ती करत असतो. मी इतर चाहत्यांप्रमाणेच धोनीचाही चाहता राहील. धोनीवर नफरत करण्यासाठी तुम्हाला राक्षसच व्हावं लागेल.” अशी प्रतिक्रिया पांड्याने धोनीबाबत बोलताना दिली आहे. पांड्याचा व्हिडीओ गुजरात टायटन्सने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले असून चाहत्यांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.