Preity Zinta Video Viral On Social Media : सिनेमांमध्ये अप्रतिम अभिनय करून अभिनेता शाहरुख खान आणि प्रीती झिंटा जोडीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता आयपीएलमध्येही ‘शाहरुख खान’ने पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटाला खूश केलं आहे. राजस्थानविरोधात झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा ४ विकेट्सने पराभव झाला. पंरतु, शाहरूख खानने आक्रमक फलंदाजी करून प्रीती झिंटा आणि पंजाब किंग्जच्या चाहत्यांचं हृदय जिंकलं. राजस्थानविरोधात शाहरुखने फक्त २३ चेंडूवर ४१ धावांची खेळी साकारली. यामध्ये चार चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. शाहरुख आणि सॅम करनने राजस्थानचा गोलंदाज युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाब किंग्जने १९ व्या षटकात शाहरुख आणि सॅमने मिळून चहलच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली. या षटकात दोघांनी १९ धावा कुटल्याने पंजाबला २० षटकात ५ विकेट्स गमावत १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. ज्यावेळी शाहरुख आणि सॅम धडाकेबाद फलंदाजी करत होते, त्यावेळी पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाचा आनंद द्विगुणीत झाला होता.

नक्की वाचा – जॉस ‘द बॉस’ नाही! बटलरच्या नावावर IPL चा सर्वात लाजिरवाणा विक्रम, ‘अशी’ खराब कामगिरी करणारा बनला एकमेव फलंदाज

इथे पाहा व्हिडीओ

परंतु, प्रीती झिंटाचा हा आनंद जास्ट काळ राहिला नाही. कारण राजस्थानने हा सामना जिंकून पंजाब किंग्जला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता दाखवला. पंजाब किंग्ज पुन्हा एकदा टॉप ४ मध्ये पोहोचण्यात अयशस्वी ठरली. पंजाब किंग्जचा पराभव झाल्यानंतर कर्णधार शिखर धवनने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “खराब सुरुवात झाल्यानंतर जितेश, शाहरुख आणि करनने सामन्यात वापसी केली. पंरतु, आम्ही भेदक गोलंदाजी केली नाही. मला वाटतंय की, या मैदानावर २०० धावांचं लक्ष्य चांगला स्कोअर ठरला असता.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch preity zinta celebrates shahrukh khan and sam curran outstanding batting against rajasthan royals rr vs pbks ipl 2023 nss