Sachin Tendulkar 50th birthday: दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ५०वा वाढदिवस शनिवारी (२२ एप्रिल, २०२३) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील त्याच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग सामन्यादरम्यान साजरा करण्यात आला. तेंडुलकरचा वाढदिवस २४ एप्रिलला असला तरी तो दोन दिवस आधी वानखेडे मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

वयाच्या ५० धावांपर्यंत पोहोचणे हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक असल्याचे सचिनने विनोदाने म्हटले होते. पंजाब किंग्जच्या फलंदाजी डावातील दुसऱ्या ब्रेकमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या डगआऊटजवळ केक कापला. हा कार्यक्रम मुंबई इंडियन्सने आयोजित केला होता. तेंडुलकरने २००८ ते २०१३ या कालावधीत आयपीएलमध्ये या संघाचे प्रतिनिधित्व केले. खेळाला अलविदा केल्यानंतरही तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. यावेळी वानखेडे स्टेडियमवर ३०,००० हून अधिक चाहत्यांना सचिन तेंडुलकरचा मुखवटा देण्यात आला. टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो नेहमी १० क्रमांकाची जर्सी परिधान करतो. या अनुभवी फलंदाजाच्या नावाचा जयघोष स्टेडियममध्ये पंजाब किंग्जच्या डावातील १०व्या षटकानंतर ‘सचिन…सचिन’ असा सुरु झाला. चाहत्यांनी सचिन-सचिनच्या नावाने ज्या घोषणा दिल्या त्यामुळे संपूर्ण मैदान उत्साहाने फुलून गेले होते.

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century Becomes First Indian Batsman IND vs SA
Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!

फ्रँचायझीने यापूर्वी एका प्रकाशनात म्हटले होते की, “सचिनने क्रिकेटमध्ये १० क्रमांकाची जर्सी आयकॉनिक बनवली आहे आणि भारतासाठी सामना खेळून त्याला आता १० वर्षे पूर्ण होत आली आहेत. निवृत्तीचा शेवटचा सामनाही वानखेडे स्टेडियमवर झाला होता. या निमित्ताने, आम्ही शनिवारी भारतासाठी सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळून धावा करणाऱ्या या मास्टर-ब्लास्टर खेळाडूची शानदार कारकीर्द साजरी करू.” याव्यतिरिक्त, गरवारे पॅव्हेलियनच्या बाहेर, चाहत्यांना फोटो क्लिक करण्यासाठी तेंडुलकरची १० क्रमांकाच्या जर्सीची एक मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली होती.

सामन्यात काय झाले?

अवघ्या ६ चेंडूत १६ धावांची गरज होती. हातात ६ विकेट्स होत्या. स्ट्राईकवर टीम डेविड आणि नॉन-स्ट्राईकवर तिलक वर्मा यांसारखे तगडे फलंदाजही होते. तरीही मुंबई इंडियन्स संघाच्या तोंडचा घास अर्शदीप सिंग याने पळवला. आयपीएल २०२३ स्पर्धेचा ३१वा सामना मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबई विजयाच्या अगदी जवळ पोहोचली असताना, पंजाबच्या सिंहाने म्हणजेच अर्शदीप सिंगने दोन वेळा स्टंप मोडला. तसेच, भेदक मारा करत पंजाबला १३ धावांनी विजयी केले.

हेही वाचा: MI vs PBKS: ६, wd, ४, १, ४, ६, ४no, ४ अर्जुनच्या एका षटकात कुटल्या ३१ धावा, आकडा पाहून कर्णधार रोहितही म्हणतो, “कधी संपणार… “

अर्शदीपने या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली आणि अखेरच्या षटकात फक्त २ धावा देऊन आपल्या संघाला १३ धावांनी विजय मिळवून दिला. त्याने यादरम्यान एकूण ४ षटकात २९ धावा खर्च करत ४ विकेट्स चटकावल्या. शेवटच्या षटकात त्याने लक्षवेधी गोलंदाजी करत क्रिकेटप्रेमींचाही आनंद द्विगुणीत केला.