Arjun Tendulkar Debut In IPL : टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीगच्या रविवारच्या टी-२० सामन्यात पदार्पण केलं. अर्जुनने पदार्पण करताच एक खास कमाल केली. सचिन आणि अर्जुनती पिता-पुत्राची अशी जोडी बनली, जे आयपीएलमध्ये खेळले आहेत. अर्जुन तेंडुलकरला सर्वात आधी मुंबई इंडियन्सने २०२१ मध्ये टीममध्ये सामील केलं होतं. २०२१ आणि २०२२ मध्ये अर्जुनला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.
परंतु, २०२३ मध्ये अखेर आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुनच्या आयपीएलमध्ये पदार्पण केल्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, त्याला पहिलं षटक देण्यात आलं.अर्जुनने पहिल्या षटकात ५ धावा दिल्या. अर्जुनच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना रहमुल्लाह गुरबाजने केला होता.
पहल्या चेंडूवर – एकही धाव नाही
दुसऱ्या चेंडूवर – २ धावा
तिसऱ्या चेंडूवर – १ धाव
चौथ्या चेंडुवर – १ धाव
पाचव्या चेंडुवर – एकही धाव नाही
सहाव्या चेंडुवर – एक धाव
इथे पाहा व्हिडीओ
सचिन-अर्जुनचा अजबगजब योगायोग
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करताना सचिन तेंडुलकरनेही पहिल्या षटकात ५ धावा दिल्या होत्या. २००९ मध्ये पहिल्यांदा सचिनने मुंबई इंडियन्सकडून पहिलं षटक फेकलं होतं. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, सचिनने आयपीएलमध्ये पहिलं षटक केकेआरच्या विरुद्ध फेकलं होतं. तर, अर्जुननेही पहिलं षटक केकेआर संघाविरोधात झालेल्या सामन्यात फेकलं आणि ५ धावा दिल्या. सचिनची मुलगी सारा तेंडुलकरने इन्स्टास्टोरीवर हा योगायोग शेअर केला आहे.