Sarfaraz Khan Batting Video Viral : आयपीएलमध्ये सरफराज खान धावांसाठी संघर्ष करत असून चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. घरेलू क्रिकेटमध्ये धमाका करणाऱ्या सरफराजकडून चाहत्यांना या आयपीएलमधून खूप अपेक्षा होत्या. परंतु, सरफराजने यंदाच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली नाहीय. त्याने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये सरफराजने फक्त ५३ धावाच केल्या आहेत. दिल्लीत सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात सरफराजला धावा कुटण्याची संधी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु, यावेळी सरफराजला धावांचा पाऊस पाडण्यात अपयश आलं. या सामन्यात त्याने १० चेंडूत फक्त ९ धावा केल्या. परंतु, नटराजनच्या गोलंदाजीवर सरफराजने जमिनीवर झोपून चेंडूला चौकाराच्या दिशेनं मारलं. सरफराजच्या या आगळ्यावेगळ्या शॉटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सरफराजचा तो शॉट पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या

इथे पाहा व्हिडीओ

हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात सरफराजने वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या गोलंदाजीवर पिचवर झोपून पॅडल स्वीप शॉट मारला. विकेटकीपरच्या मागे मारलेला चेंडू सीमारेषा पार गेला. सरफराज अशाप्रकारची फलंदाजी करण्यात माहीर आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना सरफराजकडून धावांची अपेक्षा होती. परंतु, त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch sarfaraz khan outstanding batting video against sunrisers hyderabad ipl 2023 nss