Rohit Sharma interacting with wife Ritika via video call: आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. त्यांनी मंगळवारी ६ गडी राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. याआधी मुंबईला सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईच्या रोमांचक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेहशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
रोहित आणि रितिकाच्या व्हिडिओचा एक छोटासा भाग मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित आणि रितिका यांच्या व्हिडिओ कॉलपूर्वी आयपीएलच्या ट्विटर हँडलवर आणखी मनोरंजक व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.
सलग दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात मुंबईने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार रोहितने पत्नी रितिकाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या व्हिडिओ कॉल दरम्यान रोहितने रितिकाला गंमतीत सांगितले की, व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. हे ऐकून रितिका हसू लागली. रोहितच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘आम्ही तोपर्यंत झोपणार नाही, जोपर्यंत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ टाकणार नाही’. यावर मुंबई इंडियन्सच्या अॅडमिनने ‘धीर धरा’ असे उत्तर दिले.
तत्पुर्वी मुंबईला त्यांच्या पहिल्या सामन्यात बंगळुरूविरुद्ध ८ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर त्यांना चेन्नई सुपर किंग्जने ७ विकेट्सने पराभूत केले होते. आयपीएल २०२३ च्या तिसऱ्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्माने आयपीएलच्या २५ डावानंतर सलामीवीर म्हणून अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने सर्व १० गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने शेवटच्या चेंडूवर चार गडी गमावून विजय मिळवला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तिलक वर्माने ४१ आणि ईशान किशनने ३१ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन आणि मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतली.