Washington Sundar out of IPL 2023: आयपीएलच्या १६ व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आयपीएल २०२३ च्या उर्वरित सामन्यांचा भाग होऊ शकणार नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर आयपीएल २०२३ मधीलच उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मात्र, हैदराबादने सुंदरच्या बदलीची घोषणा केलेली नाही. सुंदर स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला निरोप दिला. याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत वॉशिंग्टन सुंदर म्हणाला, “हॅलो ऑरेंज आर्मी. हे माझ्यासाठी खूप दु:खद आहे आणि तुम्हाला माहिती आहे की, या क्षणी हा संघ सोडणे माझ्यासाठी निराशाजनक आहे. उप्पल (राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम) येथे खेळताना मला खूप आनंद झाला जेव्हा तुम्ही लोक मोठ्या संख्येने आलात आणि आम्हाला पाठिंबा दिला. मला खात्री आहे की मला तिथे पुन्हा केशरी जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीसाठी सर्वांचे आभार.”

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

सनरायझर्स हैदराबादने एक व्हिडिओ शेएर केला आहे, ज्यामध्ये सुंदर त्याच्या संघातील उर्वरित खेळाडूंना भेटत आहे. जाण्यापूर्वी तो हात मिळवताना आणि प्रत्येक खेळाडूला मिठी मारताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अलविदा म्हणणे नेहमीच कठीण असते. आम्हांला खात्री आहे की, सुंदर, तू आणखी ताकदीने परत येशील.’ वॉशिंग्टन सुंदरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने लागला नसला, तरी त्याने एका षटकात ३ मोठे बळी घेतले आणि संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

हैदराबादला सुंदरची उणीव भासेल –

मात्र, सुंदर खेळत नसल्याने मधल्या फळीत सनरायझर्स हैदराबादला त्याची उणीव भासेल. एवढेच नाही तर स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल तसतशी खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अधिक उपयुक्त ठरतील. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरची अनुपस्थिती हैदराबादसाठी मोठा धक्का आहे.

सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत ९व्या स्थानावर –

या मोसमात मोठ्या खेळाडूंवर बोली लावूनही सनरायझर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या ७ पैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबाद सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे.

हेही वाचा – IPL 2023: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या १६व्या हंगामातून बाहेर

वॉशिंग्टन सुंदरची आयपीएल कारकीर्द –

भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने या मोसमात फार काही केले नसेल, पण त्याची आयपीएल कारकीर्द तितकीशी वाईट नाही. २०१७ मध्ये पदार्पण करणाऱ्या सुंदरने ५८ आयपीएल सामने खेळले असून ७.३६ च्या इकॉनॉमी रेटने ३६ विकेट घेतल्या आहेत. १६ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सुंदरने आयपीएल कारकिर्दीत ३७८ धावा केल्या आहे.