Virat kohli And Sachin Tendulkar Viral Video : आयपीएल २०२३ चा ५४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. तत्पूर्वी आरसीबीचा स्क्वॉड मैदानात पोहोचला असून खेळपट्टीचा आढावा घेत असल्याचं समोर आलं आहे. पण सोशल मीडियावर संपूर्ण क्रीडाविश्वात धावांचा पाऊस पाडणाऱ्या दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची चर्चा जास्त रंगली आहे. किंग कोहली विराटने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकचरी वानखेडे मैदानात भेट घेतली आणि दोघांमध्ये एकच चर्चा रंगली. जगातील महान क्रिकेटर्स मैदानात एकमेकांना भेटले आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ इंटेरनेटवर तुफान व्हायरल झाले.

आरसीबीच्या आगामी सामन्याआधी संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली त्याचा आयडॉल आणि मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरला भेटला. या खास मुलाखतीदरम्यान दोन्ही महान खेळाडू मस्ती करताना दिसले. आरसीबीकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत कोहली आणि सचिन एकमेकांना हात मिळवून गळाभेट देत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर किंग कोहली सचिनच्या कानात काहीतरी सांगत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर दोन्ही भारतीय खेळाडू हसत असल्याचं दृष्य कॅमेरात कैद झालं आहे. भारताच्या या दिग्गज फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत ५९६७९ धावा कुटल्या आहेत. तर दोघांनी मिळून १७५ शतक ठोकले आहेत.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

नक्की वाचा – WTC फायनलमध्ये कांगारुंना भरणार धडकी! के एल राहुलच्या जागेवर ‘या’ धाकड फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री

आयपीएलच्या १६ व्या सीजनमध्ये या दोन्ही संघांनी त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरोधात खेळताना केली होती. ज्यामध्ये आरसीबीने ८ विकेट्सने शानदार विजय संपादन केला होता. आगामी सामन्यात रोहित शर्माची पलटण बंगळुरुला घरेलू मैदानावर हरवून मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या हेतून मैदानावर उतरेल. तर दुसरीकडे विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सीजनमध्ये त्याने १० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४६.५६ च्या सरासरीनं आणि १३५.१६ च्या स्ट्राईक रेटनं ४१९ धावा कुटल्या आहेत. तसंच कोहलीने सहा अर्धशतक ठोकण्याची चमकदार कामगिरी केली आहे.

Story img Loader