मुंबई इंडियन्सच्या संघाचा मुख्य मार्गदर्शक असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर हा आयपीएलच्या मागील पर्वापासून संघासोबत आहे. यंदाच्या आयपीएल लिलावामध्ये मुंबईने ३० लाख रुपयांना अर्जूनला विकत घेतलं. मात्र दोन्ही पर्वांमध्ये अर्जूनला प्रत्यक्षात एकाही सामन्यामध्ये संघात स्थान देण्यात आलं नाही. याचसंदर्भात आता सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> हेटमायरच्या पत्नीबद्दल सुनिल गावस्करांचं वादग्रस्त वक्तव्य; RR vs CSK सामन्यात कॉमेन्ट्रीदरम्यान म्हणाले, “मोठा प्रश्न हा आहे की…”

अर्जूनला यंदाच्या पर्वामध्येही संधी देण्यात आलेली नाही याबद्दल सचिनला थेट प्रश्न विचारण्यात आला असताना त्याने त्यासंदर्भात पहिल्यांदाच मोकळेपणे भाष्य केलंय. मला काय वाटतं किंवा माझं मत काय आहे हे या प्रकरणासंदर्भात महत्वाचं नाहीय. कारण अंतिम संघाची निवड मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून केली जाते, असं सचिनने म्हटलंय.

अर्जूनला संधी देण्यात आली नाही याबद्दल विचारलं असताना सचिनने आधी तर हा प्रश्न फार वेगळा असल्याचं मत नोंदवलंय. “हा फार वेगळा प्रश्न आहे. मला याबद्दल काय वाटतं किंवा मी काय विचार करतो हे फार महत्वाचं नाहीय. यंदाचं पर्व संपलं आहे,” असं सचिन म्हणाला. ‘सचिनसाईट’ नावाच्या कार्यक्रमामध्ये त्याला अर्जूनला आयपीएलमध्ये खेळताना पहायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरच उत्तर देताना त्याने हे भाष्य केलंय.

नक्की वाचा >> IPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…

मुंबईच्या संघाचा सल्लागार असणाऱ्या सचिनने अंतिम संघात खेळाडू निवडण्याच्या बाबतीत दखल देत नसल्याचं स्पष्ट केलं. आपण तो निर्णय संघ व्यवस्थापनाला घेऊ देतो, असं सचिन म्हणालाय. “जर निवड करण्याबद्दल बोलायचं झालं तर मी त्यात कधीच पडत नाही. मी सर्व गोष्टी या संघ व्यवस्थापनावर सोडतो. कारण मी कायमच अशापद्धतीने काम करत आलोय,” असं सचिन म्हणाला.

अर्जूनसोबत होणाऱ्या चर्चेबद्दलही सचिनने या मुलाखतीत माहिती दिली. “मी जेव्हा अर्जूनबरोबर चर्चा करतो तेव्हा त्याला सांगतो की मार्ग खडतर आहे. हे फार कठीण असणार आहे याची जाणीव करुन देतो. तू क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण तुला तो खेळ आवडतो. तू तेच करत राहा. तू कष्ट घे चांगली फळं मिळत जातील,” असं सचिन मुलासोबतच्या संवादाबद्दल बोलताना म्हणाला.

नक्की वाचा >> साडी, चंद्रकोर अन् नाकात नथ; सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळ्या लूकमधील फोटो व्हायरल

यंदाच्या आयपीएलच्या पर्वामध्ये मुंबईची कामगिरी त्यांच्या नावाला साजेशी राहिली नाही. संघाने १४ पैकी केवळ चार सामने जिंकले आणि पॉइण्ट टेबलमध्येही संघ अगदी तळाशी होती. संघाचे चार ते पाच सामने बाकी असतानाच संघ स्पर्धेबाहेर पडल्यावर शिक्कमोर्तब झालं होतं.

Story img Loader