IPL Rule Recap : आयपीएलचा १६ वा हंगाम आजपासून सुरू होणार असून नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. आयपीएलला अजून रोमांचक करण्यासाठी या वेळी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याबाबत जाणून घेऊ या सविस्तर माहिती.

क्रिकेट चाहत्यांसाठी आता इंडियन प्रीमियर लीगची प्रतीक्षा संपली आहे. कारण आज सायंकाळी आयपीएल २०२३ चा पहिला सामना खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा महेंद्र सिंग धोनीकडे असून गुजरात टायटन्सचं नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. आयपीएलचे सामने अधिक रंगतदार होण्यासाठी ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा नियम सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी, या नियमानुसार सामना सुरू असताना संघात केव्हा बदल करता येईल? विदेशी खेळाडू बदलता येईल का? असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
speed of vehicles on Mumbai Pune Expressway will now be controlled by AI based cameras
सावधान! आता ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे होणार कारवाई… कोठे आणि कशी यंत्रणा ?
devmanus fame kiran gaikwad will get marry with vaishnavi kalyankar on 14 december
Video: मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, मजेशीर व्हिडीओ शेअर करत तारीख केली जाहीर
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम काय आहे?

सामना सुरू असताना प्लेइंग-११ मधून एखाद्या खेळाडूला बाहेर करून त्याच्या जागी नवीन खेळाडूचा समावेश करणे म्हणजेच ‘इम्पॅक्ट प्लेयर’ होय. यासाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणेफेक सुरू असताना प्लेइंग-११ शिवाय अन्य ४-४ खेळाडूंची नावे घोषित करावी लागतील. यांपैकी एखाद्या खेळाडूला बदलता येईल.

नक्की वाचा – IPL 2023, CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एम एस धोनी रचणार इतिहास; ‘या’ खास विक्रमाला घालणार गवसणी?

सामन्यात या नियमाचा वापर कधी करता येतो?

प्रत्येक इनिंगमध्ये १४ व्या षटकाआधी संघ व्यवस्थापन या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा वापर करू शकते. एखाद्या षटकात खेळाडू दुखापतग्रस्त होतो किंवा खेळाडू बाद होतो, त्या वेळी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा वापर करून खेळाडू बदलता येईल.

पाऊस आला किंवा सामन्यातील षटके कमी असल्यास, काय होईल?

जर एखादा सामना पावसाच्या कारणामुळे १०-१० षटकांचा खेळवण्यात आला, तर या नियमाचा वापर करता येणार नाही. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमचा वापर करण्यासाठी सामना १० षटाकांपेक्षा जास्त खेळवण्याची आवश्यकता असेल.

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा वापर कसा करू शकता?

संघाचा कर्णधार, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक किंवा फोर्थ अंपायरच्या माध्यमातून इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा वापर करण्याची सूचना फिल्ड अंपायरला देऊ शकता. त्यानंतर फिल्ड अंपायर दोन्ही हात वर करून क्रॉस बनवेल आणि मूठ करून इशारा देईल. तेव्हा या नियमाचा वापर झाल्याचं स्पष्ट होईल.

नक्की वाचा – IPL 2023 : कर्णधारांच्या फोटोशूटमध्ये रोहित शर्माने का मारली दांडी? यामागचं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सामना सुरू असताना बाहेर गेलेल्या खेळाडूचं काय?

आयपीएलच्या नियमानुसार, प्लेइंग-११ मध्ये फक्त चार विदेशी खेळाडू खेळवले जाऊ शकतात. जर एखाद्या संघात आधीपासूनच प्लेइंग-११ मध्ये चार विदेशी खेळाडू असतील, तर पाचव्या विदेशी खेळाडूचा समावेश करता येणार नाही. जर यामध्ये तीन विदेशी खेळाडूंचा समावेश असेल, तर चौथा विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवला जाऊ शकतो.

‘इम्पॅक्ट प्लेयर’ किती षटके टाकू शकतो?

इम्पॅक्ट प्लेयर प्लेइंग-११ मध्ये सामील झाल्यावर नियमानुसार चार षटकांची गोलंदाजी करू शकतो. हा इम्पॅक्ट प्लेयर ज्या खेळाडूच्या जागेवर आला आहे, त्याने जरी चार षटके पूर्ण केली असली, तरीही तो खेळाडू चार षटके टाकू शकतो. ????जर इम्पॅक्ट प्लेयरला सामना मध्यावधीत आल्यावर षटक टाकायला दिलं, तर तो खेळाडू ते षटक पूर्ण करू शकत नाही.???? त्याला नवीन षटक टाकावं लागेल.

याआधी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा वापर केला होता?

बीसीसीआयने हा नियम ट्रायलसाठी आयपीएलच्या आधी घरेलू टी-२० टूर्नामेंटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत लागू केला होता. तेव्हा सर्वात आधी दिल्लीच्या संघाने या नियमाचा वापर केला होता. मणिपूरच्या जागेवर ऋतिक शौकीनला बदलून आणण्यात आलं होतं. तेव्हा ऋतिक पहिला इम्पॅक्ट प्लेयर बनला होता.

Story img Loader