Arjun Tendulkar Latest News Update : अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून चमकदार कामगिरी केली आहे. मागील सामन्यात अर्जुनने हैद्राबादच्या भुवनेश्वर कुमारला बाद करून आयपीएलमधील त्याच्या पहिल्या विकेटवर शिक्कामोर्तब केलं. २०२१ मध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सशी जोडला गेला. परंतु, आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागली. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने प्रभावीत केलच आहे. पण त्याने घातलेल्या जर्सी नंबर २४ ची क्रीडाविश्वात तुफान चर्चा रंगली आहे. या नंबरच्या जर्सीमागं नेमकं काय कारण आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलमध्ये अर्जुन जर्सी नंबर-२४ घालून खेळत आहे. त्याच्या जर्सीवर २४ नंबर लिहिलेला आहे. अर्जुन तेंडुलकरचा जर्सी नंबर २४ पाहून चाहत्यांनी तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. अर्जुनने २४ नंबरची जर्सी यासाठी घातली आहे, कारण २४ एप्रिल त्याचे वडील सचिन तेंडुलकरचा जन्मदिवस आहे. वडीलांच्या वाढदिवसाच्या कनेक्शनमुळं अर्जुन आयपीएलमध्ये २४ नंबरची जर्सी घालत आहे. याशिवाय अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ ला झाला होता. म्हणजेच २४ नंबरसोबत खास कनेक्शन असल्यामुळं अर्जुन आयपीएलमध्ये जर्सी नंबर २४ घालत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा – राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्यानंतर के एल राहुलची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “कर्णधार म्हणून माझ्याकडून चूक…”

सचिन जेव्हा आयपीएल खेळत होता, तेव्हा तो १० नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन १० नंबरची जर्सी घालून खेळत असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दरम्यान सचिनने ३३ आणि ९९ नंबरची जर्सीही घातली होती. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात सचिन आणि अर्जुन तेंडुलकर सामने खेळणारी पिता-पुत्राची पहिली जोडी आहे. सचिनने २००८ पासून २०१३ पर्यंत सहा वर्ष मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the special connection of arjun tendulkars jersey number 24 know the reason behind it sachin tendulkar birthday nss