Anand Mahindra Tweet Viral, IPL 2023 Final : आयपीएल फायनलबाबत आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्वीट इंटरनेटवर व्हायरल झालं आहे. आज होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यात महिंद्रा कोणत्या संघाला समर्थन देणार आहेत, याबाबत त्यांनी ट्वीट करून स्पष्ट भूमिका मांडली आहे. आज रात्री जो संघ अप्रतिम कामगिरी करेल, त्या संघाच्या जिंकण्याबाबत महिंद्रांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच ट्वीट व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनीही यावर जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
महिंद्रा यांनी ट्विटरवर म्हटलंय, “आज रात्री होणाऱ्या फायनलमध्ये मी कोणत्या संघाचं समर्थन करेल, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. मी शुबमन गिलच्या कौशल्यांवर विश्वास ठेवतो आणि मला त्याला आज रात्री जिंकताना पाहायचं आहे. पण मी महेंद्रसिंग धोनीचा चाहता आहे आणि मला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आज रात्री चांगल्या संघाला जिंकू द्या.”
दरम्यान वीरेंद्र सेहवागनेही धोनीबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय, क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, “धोनीसाठी इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू होत नाही. कारण जो इम्पॅक्ट प्लेयर असेल, त्या एकतर फलंदाजी करावी लागेल किंवा गोलंदाजी, पण कॅप्टन्सी करू शकत नाही. पूर्ण २० षटक तो खेळाडू मैदानावर राहू शकत नाही. धोनीने या वर्षी खूप जास्त फलंदाजी केली नाहीय. तो शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करायला येतो आणि वेगाने धावा काढतो. हाच धोनीचा प्लॅन राहिला आहे. धोनी जर पुढे खेळला, तर कर्णधार म्हणूनच खेळू शकतो. त्यामुले धोनीसाठी इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू होत नाही. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळावं लागेल की मेन्टॉर म्हणून संघासोबत राहावं लागेल. हे पाहावं लागेल. हातात छडी घेऊन संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवणार आणि मार्गदर्शन करणार.”