Who is Mumbai Indians Debutant Anshul Kamboj: मुंबई इंडियन्स हैदराबादविरूद्ध वानखेडेवर सामना खेळत आहे. या सामन्यात मुंबईकडून नव्या चेहऱ्याला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबईने अंशुल कंबोजला हैदराबादविरूद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. अंशुल कंबोजने पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेटही मिळवली. अंशुलच्या नावे पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट्सही झाले असते, तर हेडला क्लीन बोल्ड करणारा गोलंदाज अशीही त्याची ओळख होता होता राहिली, अंशुलचे पदार्पण एकूणच खूप नाट्यमय होते, पण हा मुंबईचा नवा शिलेदार आहे कोण?

२३ वर्षीय कंबोज हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. अंशुल हा कर्नाल, हरियाणाचा आहे आणि तो यापूर्वी भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळला आहे. नमन धीरनंतर या मोसमात मुंबईसाठी पदार्पण करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. अंशुल कंबोजने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. ज्यात त्याने १० सामन्यात १७ विकेट घेतल्या.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson's wife reacts to hundred vs Proteas: My forever favourite hero
Sanju Samson : ‘तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो…’, संजू सॅमसनच्या शतकी खेळीनंतर पत्नी चारुलताच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

अंशुल कंबोजच्या चेंडूवर हेड क्लीन बोल्ड पण…

पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येक गोलंदाज आपल्या खेळीने छाप पाडण्याचा प्रयत्न करतो, अंशुलनेही आजच्या सामन्यात अगदी तेच केलं, त्याला पहिली विकेट मिळाली खरी पण त्याच्या दोन मोठ्या विकेट्स हुकल्यानंतरच. अंशुलने त्याच्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेडला क्लीन बोल्ड केले. पण अंशुलचं नशीब खराब म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण तो नो बॉल ठरला आणि अंशुलला मोठी विकेट मिळता मिळता राहिली. त्यानंतर त्याच्या पुढील षटकात पुन्हा एकदा हेडला झेलबाद करण्याची संधी आली. हेडने त्याच्या चेंडूवर थर्ड मॅनवर षटकार लगावला. तिथे तुषारा हजर होता पण त्याने मात्र झेल सोडला. अशारितीने हेड नाबाद राहिला.

पण अंशुलने त्याच्या पुढील षटकात मयंक अग्रवालला क्लीन बोल्ड करत आपली पहिली विकेट मिळवली. आयपीएलमधील पहिली विकेट मिळवल्याचं त्याने शानदार सेलीब्रेशन केलं. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबादचे फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकले नाही.