Who is Akash Madhwal: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजायंट्सचा पराभव केला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ५ वेळच्या चॅम्पियनच्या विजयाचा झेंडा फडकवण्याचे श्रेय आकाश मधवालला जाते. आकाश मधवालने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले. किलर यॉर्करने ३.३ षटकात अवघ्या ५ धावांत ५ बळी घेत मुंबईला क्वालिफायर-२ मध्ये पोहोचवले. आता हा आकाश मधवाल कोण आहे आणि तो कुठून आला. त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर मग आकाश मधवालबद्दल जाणून घेऊया.

ऋषभ पंतचे शेजारी असून दोघांचा गुरु एकच –

धंदेरा, रुरकी येथे राहणारा मधवाल हा ऋषभ पंतचा शेजारी आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. क्रिकेटमध्ये उत्सुकता दाखवण्यापूर्वी त्याने आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. दिल्लीला जाण्यापूर्वी पंतला प्रशिक्षण देणाऱ्या अवतार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तो क्रिकेट खेळायला शिकला. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत अवतारने याबद्दल सांगितले, आकाशचे घर ऋषभच्या समोर आहे. ते शेजारी आहेत. दिवंगत तारक सिन्हा सरांसोबत प्रशिक्षणासाठी दिल्लीला जाण्यापूर्वी ऋषभ माझ्या हाताखाली खेळला. २०१३ मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत मधवालने भारतीय सैन्यात असलेले वडील गमावले.”

वसीम जाफर आणि मनीष झा यांच्यकडून आकाशचा शोध –

उत्तराखंडचे मुख्य प्रशिक्षक मनीष झा यांनी आकाशबद्दल सांगितले, “जेव्हा तो २०१९ मध्ये चाचणीसाठी आला होता. आम्ही सर्व खूप प्रभावित झालो. तो स्मूथ अॅक्शनबरोबर स्किडी आणि वेगवान आहे. त्यापैकी एक एक्स-फॅक्टर होता. वसीम भाई (वसिम जाफर) ने त्याला आपल्या सोबत घेऊन सरळ कर्नाटक विरुद्ध सय्यद मुश्ताक अली सामन्यात संधी दिली. त्यानंतर जेव्हा कोविडच्या काळात रणजी करंडक रद्द झाला आणि मी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा मी त्याला सांगितले की, तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळेल. मी त्याला आश्वासन दिले की त्याला सर्व सामने खेळण्याची संधी मिळेल.”

हेही वाचा – LSG vs MI: आकाश मधवालने रचला इतिहास, माजी खेळाडू अनिल कुंबळेच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

अशाप्रकारे रोहित शर्माचा आवडता गोलंदाज बनला –

अवतारन पुढे म्हणाले, “तो भरपूर टेनिस बॉल क्रिकेट खेळला आहे. वेग होता पण अचूकता कमी होती. तो त्याच्या गोलंदाजीवर खूप प्रयोग करत असे. माझी एकच चिंता होती की, जर तुम्हाला वेगवान आणि सरळ गोलंदाजी करता येत असेल तर तुम्ही गोलंदाजी हळू का करत आहात. हळूहळू त्याने स्वतःवर नियंत्रण मिळवले.” येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की मधवाल गेल्या वर्षी दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवच्या जागी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता आणि आता तो रोहित शर्माचा आवडता गोलंदाज बनला आहे.

हेही वाचा – CSK vs GT: ”…म्हणून चेन्नईविरुद्ध गुजरातचा पराभव झाला”; दीपक चहरने सांगितले पराजयाचे सर्वात मोठे कारण

गुजरात आणि हैदराबादविरुद्ध शानदार कामगिरी केली होती-

अनकॅप्ड खेळाडू म्हणून आकाश मधवालही सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने अंकित राजपूतला मागे सोडले आहे. २०१८ मध्ये, अंकितने पंजाब किंग्ज (तत्कालीन किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध १४ धावांत ५ बळी घेतले होते. आकाशने या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३७ धावांत ४ बळी घेतले होते. गुजरात टायटन्सविरुद्ध ३१ धावांत ३ बळी घेतले होते.