Who is Priyansh Arya Scored Fastest IPL Century vs CSK: प्रियांश आर्य… पंजाब किंग्सच्या या सलामीवीर युवा फलंदाजाने आपल्या शतकी कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं. चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात एकापेक्षा एक गोलंदाजांची धुलाई करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. प्रियांश आर्य पंजाब किंग्सकडून सलामीला उतरतो. प्रियांशने चेन्नईविरूद्ध सामन्यात खलील अहमदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला, यानंतर पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवरही त्याने षटकार लगावला. यानंतर त्याने १९ चेंडूत त्याने पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. यानंतर त्याने अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार-चौकार लगावले. यानंतर त्याने ३९ चेंडूत शानदार शतक पूर्ण केले. पण हा वादळी फलंदाजी करणारा प्रियांश आर्य कोण आहे जाणून घेऊया.
प्रियांश आर्यने ४२ चेंडूत २५२च्या स्ट्राईक रेटने ७ चौकार आणि ९ षटकारांसह १०३ धावांची अनोखी खेळी केली. पंजाब किंग्सचे एका टोकाकडून विकेट्स पडत असताना संघाच्या धावसंख्येची जबाबदारी एकट्याने उचलून धरली. ८ षटकांमध्ये निम्मा पंजाब संघ माघारी परतला होता. पण त्याने संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागू दिला नाही.
कोण आहे प्रियांश आर्य?
प्रियांश आर्य याने दिल्ली प्रिमीयर लीगमधील आपल्या कामगिरीने लक्ष वेधलं होतं. दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2024) मधून प्रसिद्धीझोतात आलेला युवा फलंदाज प्रियांश आर्यला भविष्यातील सुपरस्टार म्हटले जात आहे. जेव्हा त्याचे नाव आयपीएल लिलावात आले तेव्हा या लीगच्या फ्रँचायझींनी त्याच्यावर मोठी बोली लावली. या खेळाडूला खरेदी करण्यासाठी दिल्ली, मुंबई, पंजाब आणि बेंगळुरूमध्ये मुकाबला झाला.पण पंजाब किंग्सने बाजी मारत त्याला संघात सामील केलं.
प्रियांशने आर्यने दिल्ली टी-२० लीगमध्ये उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारून खळबळ उडवून दिली. प्रियांश दिल्ली टी-२० लीगमध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळत होता. भारताच्या अंडर-१९ संघाकडून खेळणाऱ्या आर्यने दक्षिण दिल्लीच्या डावात १२व्या षटकात सहा षटकार मारून खळबळ उडवून दिली. डावखुऱ्या आर्यने ५० चेंडूत १० षटकार आणि १० चौकारांसह १२० धावा केल्या होत्या, तर त्याने केवळ ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.
प्रियांश आर्यचेही गौतम गंभीरबरोबर खास नाते आहे. गंभीरचे प्रशिक्षक संजय भारद्वाज हे प्रियांश आर्यचेही प्रशिक्षक आहेत. प्रियांशचे आई-वडिल सरकारी शाळेत शिक्षक आहेत.