Who is LSG Coach Sanjeev Goenka: आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ संघाला मोठ्या दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सनरायझर्स हैदराबादची सलामी जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी लखनऊने दिलेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वादळी फलंदाजी केली आणि या दोन्ही फलंदाजांनी केवळ ९.४ षटकांत १६७ धावा केल्या. सामन्यानंतरही असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका सामना संपल्यानंतर केएल राहुलवर मैदानात भडकताना दिसले. लखनऊच्या लाजिरवाण्या पराभवानंतर त्यांनी केएल राहुलला जाब विचारल्याचे व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत आहे. पण हे संजीव गोयंका नेमके आहेत कोण, ज्यांनी धोनीलाही कर्णधारपदावरून काढले होते.
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांच्या मालकीची कंपनी RPSG ग्रुपने ऑक्टोबर 2021 मध्ये ७.०९० कोटी रुपयांची बोली लावून लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझी खरेदी केली होती. लखनऊ सुपर जायंट्सने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला. केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील या संघाचा हा तिसरा आयपीएल हंगाम आहे.
गोयंका हे क्रिकेटसोबकच पॉवर आणि एनर्जी, कार्बन ब्लॅक मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, आयटी सेवा, एफएमसीजी, मीडिया, मनोरंजन आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. या समूहाच्या २३ पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि ४४,५०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
हेही वाचा- IPL 2024: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर मुंबई इंडियन्स संघातील वरिष्ठ नाराज
संजीव गोयंका २०११ पासून या समूहाचे अध्यक्ष आहेत. सुपरमार्केट चेन स्पेन्सर्स आणि स्नॅक्स ब्रँड टू यम! हे गोयंका यांच्या मालकीचे आहेत, याची जबाबदारी त्यांचा मुलगा शाश्वतच्या खांद्यावर आहे. एटीके या फुटबॉल संघात गोएंका यांची हिस्सेदारी आहे. संजीव गोयंका समुहाकडे ४.३ बिलियनइतकी मालमत्ता आहे आणि समूहाचे लाखो भागधारक देखील आहेत. संजीव गोयंका यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि सध्या ते कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या बोर्डावर कार्यरत आहेत. समूहाचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे आहे.
संजीव गोयंका हे दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये परतले आहेत. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्येही संजीव गोयंका यांच्या मालकीचा संघ आयपीएलमध्ये होता. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी होती. तेव्हा गोयंका यांच्या मालकीचा रायझिंग पुणे सुपर जायंट्स हा संघ मैदानात होता. ज्या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टीव्ह स्मिथसारखे दिग्गज खेळाडू होते. तेव्हा या संघाचा कर्णधार धोनी होता.
हेही वाचा- IPL 2024: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर मुंबई इंडियन्स संघातील वरिष्ठ नाराज
धोनीच्या जागी रायझिंग पुणे सुपरजायंट्सने स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवले. धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत, रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी तेव्हा पीटीआयला सांगितले होते की, “धोनीने पद सोडलेले नाही. आम्ही आगामी हंगामासाठी स्टीव्ह स्मिथची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. खरं सांगायचं तर, मागील हंगाम आमच्यासाठी फारसा चांगला गेला नाही आमची इच्छा होती की कोणीतरी तरुण खेळाडूडूने संघाचे नेतृत्व करावे आणि आगामी हंगामीपूर्वी संघाला एक नवीन रूप द्यावे.”