IPL 2025 GT vs MI Who is Satyanarayana Raju: मुंबई इंडियन्सचा मोसमातील दुसरा सामना गुजरात टायटन्सविरूद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत १९६ धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. पण या सामन्यात सत्यनारायण राजू या गोलंदाजाने विकेट घेतली पण तो चांगलाच महागडा ठरला. पण हा सत्यनारायण राजू कोण आहे? जाणून घेऊया.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याचे या सामन्यात पुनरागमन झाले आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले. विल जॅक्सला संधी मिळाली नाही, तर मुजीब उर रहमान मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. पण सर्वात चर्चेत असलेला विषय आहे विघ्नेश पुथूरचा संघात समावेश का नाही. सीएसकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने तीन मोठ्या विकेट घेतल्या. असे असतानाही या सामन्यात मुंबईने त्याच्या जागी सत्यनारायण राजूचा समावेश केला.
सत्यनारायण राजूने या सामन्यात आपल्या स्लोअर चेंडूने सर्वांना प्रभावित केलं. सत्यनारायण राजूने या सामन्यात ३ षटकांत ४० धावा देत १ विकेट घेतली. तर त्याने ४ वाई़ड चेंडू टाकले. त्याने १३.४० च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. सत्यनारायण राजूच्या षटकात फलंदाजांनी मोठे फटके मारले. तर अखेरच्या षटकात गुजरातने १० धावा केल्या आणि त्याने रशीद खानच्या रूपात आयपीएलमधील पहिली विकेट मिळवली.
कोण आहे मुंबई इंडियन्सचा गोलंदाज सत्यनारायण राजू?
सत्यनारायण राजू हा आंध्रप्रदेशचा क्रिकेटपटू आहे. या २५ वर्षीय वेगवान गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याला मुंबई इंडियन्स संघात संधी मिळाली. आंध्र प्रदेशातील या क्रिकेटपटूला मुंबई इंडियन्सने IPL 2025 च्या मेगा लिलावात ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते.
२०२४ आंध्र प्रीमियर लीगमध्ये राजूने शानदार गोलंदाजी केली. त्याने ७ सामन्यात ८ विकेट घेतल्या आणि त्याची इकॉनॉमी रेटने फक्त ६.१५ होती, जी चांगली मानली जाते. याशिवाय त्याने रणजी ट्रॉफीमध्येही दमदार कामगिरी केली आणि ६ सामन्यात १६ विकेट घेतल्या. सत्यनारायण राजूने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यातून पदार्पण केले.
Waited, waited… & muscled! ?#JosButtler had enough time to put that one away to the boundary! ?
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
Watch the LIVE action ➡ https://t.co/VU1zRx9cWp #IPLonJioStar ? #GTvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar pic.twitter.com/FEghx6ALa4