IPL 2023 Mumbai Indians vs Delhi Capitals Match Updates: आयपीएल २०२३ मधील ३ पराभवांनंतर, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा खेळाडूला संधी दिली, ज्याची प्रतिभा अंडर-१९ च्या दिवसात ओळखली गेली. आपण यश धुलबद्दल बोलत आहोत, ज्याला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची कॅप देण्यात आली. हा उजव्या हाताचा फलंदाज कोण आहे? धुलची खासियत काय आहे? हा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात येत असेल. चला तर मग त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

यश धुल फक्त २० वर्षांचा आहे. तो टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे आणि या खेळाडूने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे. यश धुलच्या क्रिकेटर बनण्याची कहाणीही अप्रतिम आहे. त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी मोठा त्याग केला आणि आजोबांच्या पेन्शनच्या जोरावर हा यश क्रिकेटर झाला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Yuvraj Singh Father Yograj Singh Big Revelation He Wanted to Shoot Kapil dev and went House with pistol
युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?
Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान

यश धुलचा क्रिकेटर होण्याचा प्रवास –

यश धुल हा दिल्लीचा रहिवासी असून वडील विजय धुल यांनी त्याला क्रिकेटर बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. विजय धुल यांनी धुलच्या क्रिकेटसाठी नोकरीही सोडली होती. त्यांनी आपल्या मुलाकडे विशेष लक्ष दिले. आपल्या मुलासाठी महागडी बॅट खरेदी करण्यासाठी विजय धुल यांनी घरखर्च कमी केला. तुम्हाला धक्का बसेल पण धुलचे कुटुंब त्याच्या आजोबांच्या पेन्शनवर चालत होते.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये धुलने दाखवली होती धमक –

यश धुलने गतवर्षी वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करत चॅम्पियन बनवले होते. यश धुलने त्या स्पर्धेत ४ सामन्यात ७६.३३च्या सरासरीने २२९ धावा केल्या. यानंतर रणजी ट्रॉफीमध्येही धुलने आपल्या बॅटची धमक दाखवली आणि पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावले.

टी-२० क्रिकेटमध्ये धुल तुफान फलंदाजी करतो –

यश धुलचा टी-२० फॉरमॅटमध्ये अप्रतिम रेकॉर्ड आहे. या खेळाडूने आतापर्यंत ८ टी-२० सामन्यात ७२ पेक्षा जास्त सरासरीने ३६३ धावा केल्या आहेत. धुलचा स्ट्राइक रेटही १३० पेक्षा जास्त आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुलने सुमारे ५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये धुलची सरासरीही ४० च्या जवळ आहे. हा खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम असल्याचे स्पष्ट झाले असून आता दिल्ली कॅपिटल्सने धुलला संधी देऊन त्याच्या प्रतिभेला सलाम केला आहे.

हेही वाचा – IPL 2023 CSK vs RR: तिसर्‍या विजयासाठी धोनी ब्रिगेडचा कसून सराव, संजू सॅमसनसह स्वत: कॅप्टन कूल मैदानात!

यश धुल पदार्पणाच्या सामन्यात अपयशी –

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये यश धुलला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली, परंतु तो पदार्पणाच्या सामन्यात अपयशी ठरला आहे. मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला ४ चेंडूत फक्त २ धावा केल्या. यशला रिले मेरेडिथने बाद केले. त्याचा झेल नेहाल वढेराने घेतला.

दिल्लीने मुंबईला १७३ धावांचे लक्ष्य दिले –

दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. अक्षर पटेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघासाठी चमकदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली. अक्षरने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मुंबईकडून पियुष चावला आणि बेहरेनडॉर्फने ३-३ बळी घेतले. हृतिक शोकीनला यश मिळाले.

Story img Loader