Gautam Gambhir on KKR IPL 2024 Champion : आयपीएल २०२४ च्या फायनल सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव करत आपला १० वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. याआधी गौतम गंभीर गंभीर केकेआरचा कर्णधार असताना हा संघ दोनदा चॅम्पियन बनला होता. आता केकेआरमध्ये मेंटॉर म्हणून पुनरागमन करत गंभीरने शाहरुख खानच्या टीमला पुन्हा आयपीएलचा विजेता बनवले आहे. शेवटच्या वेळी केकेआरने २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा गंभीरच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावण्यात केकेआरला यश आले आहे. या विजयानंतर गौतम गंभीरने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. त्याची सोशल मीडिया पोस्ट आता व्हायरल होत आहे.

केकेआरला तिसऱ्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर मेंटॉर गौतम गंभीरने सोशल मीडियावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून विजय साजरा केला. गंभीरने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ज्याचे विचार आणि हालचाली सत्यावर आधारित आहेत, त्याचा रथ आजही श्रीकृष्ण चालवत आहेत.”

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”

गंभीरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चाहते गंभीरचे अभिनंदन करत आहेत. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा – KKR vs SRH : ट्रॉफी जिंकण्यासोबत केकेआरचा मोठा पराक्रम, IPL च्या इतिहासात दुसऱ्यांदाच पाहायला मिळाला ‘हा’ विक्रम

केकेआरने १० वर्षांनी तिसऱ्यांदा कोरले ट्रॉफीवर नाव –

कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना जिंकला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी केली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला कधीही वरचढ होऊ दिले नाही. कोलकाताने याआधी २०१४ च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते आणि आता १० वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

हेही वाचा – IPL 2024 Final : गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक, जय शाह यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

कोलकाताने हैदराबादचा ८ गडी राखून उडवला धुव्वा –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्व १० गडी गमावून ११३ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी खेळली. केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने २.३ षटकात ७.६च्या इकॉनॉमीसह १९ धावा दिल्या आणि ३ बळीही घेतले. त्यांच्याशिवाय हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून ११४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने अर्धशतक (५२) केले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली.

Story img Loader