रविवारी संध्याकाळी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, गुजरातचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा मैदानात घाईघाईत क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला त्यावेळी त्याने उलटी ट्रॅक पॅंट घातली होती, आला तेव्हा ही मजेदार घटना घडली. मैदानात येताच साराच्या लक्षात आले, मात्र वेळेअभावी त्याने उलटी ट्रॅक पॅंट घालून विकेटकीपिंग सुरू केले. आता त्याने या उलट्या ट्राउझरमागची खरी कहाणी सांगितली आहे. त्याचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात ऋद्धिमान साहाने तुफानी फलंदाजी केली. त्याने २० चेंडूत अर्धशतक झळकावले. साहाने ४३ चेंडूत चार षटकार आणि १० चौकारांच्या मदतीनं ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. गुजरातसाठी कोणत्याही फलंदाजाचे हे सर्वात जलद अर्धशतक आहे. या खेळीदरम्यान साहाला दुखापत झाल्याने तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरत नव्हता.
या कारणामुळे ऋद्धिमान साहा उलटी ट्रॅक पॅंट घालून आला
खरे तर या सामन्यात साहाला ६८ धावांची खेळी करताना किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे तो फिल्डिंगला आला नव्हता. असे झाले असते तर, के. एस. भरत आणि इम्पॅक्ट खेळाडू अल्झारी जोसेफ यांनी पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात आले असते, जे नियमांनुसार बेकायदेशीर होते, ज्यामुळे अंपायरने त्यांना परवानगी दिली नाही.
अंपायर्सच्या निर्णयानंतर साहाला लगेच बोलावण्यात आले. यावर साहाने सांगितले की, ड्रेसिंग रूममध्ये जेवल्यानंतर तो औषध घेणार होता आणि त्याचवेळी त्याला इंजेक्शन देण्यात येणार होते. एवढ्या घाईत तो ट्रॅक पॅंट उलटी आहे की सुलटी हे बघायला विसरला आणि चुकीचा पद्धतीने घालून आला. मात्र, दोन षटकांनंतर तो बाहेर पडला आणि के.एस भरतने सामन्यात पुढे यष्टीरक्षण केले.
सामन्यात काय झाले?
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ऋद्धिमान साहा आणि शुबमन गिल (९४) यांच्या शानदार खेळीमुळे २२७ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनऊचा संघ निर्धारित २० षटकांत ७ विकेट्स गमावून केवळ १७१ धावा करू शकला. गुजरात टायटन्सने हा सामना ५६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या विजयासह, गुजरात टायटन्स प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ११ सामन्यांमधला त्यांचा हा ८वा विजय असून त्यांचे आता १६ गुण झाले आहेत. येथून एक सामना जिंकून गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनेल.
हेही वाचा: ICC ODI Ranking: भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड, केवळ ४८ तासात झाला मोठा फेरबदल
गुजरात टायटन्स प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ
या सामन्यात लखनऊचा पराभव करून गुजरातने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यांचे आता १६ गुण आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये पात्रता निश्चित करण्यासाठी फक्त एक सामना जिंकणे आवश्यक आहे. उर्वरित तीनही सामने जिंकून संघ टॉप-२ मध्ये राहण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित.