Rohit Sharma Absent In IPL 2023 Photoshoot : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलच्या कर्णधारांच्या फोटोशूटमुळं चर्चेत आला आहे. आयपीएलच्या ९ संघांचे कर्णधार या फोटोशूटसाठी उपस्थित होते. परंतु, रोहित शर्मा या फोटोशूटला गैरहजर होता. त्यामुळं सोशल मीडियावर रोहितबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आयपीएलपूर्वीच रोहित शर्मा गायब झाला का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मोठी अपडेट समोर आली आहे. गुरुवारी आयपीएल २०३३ चा सर्व कर्णधारांच्या समवेत एक फोटोशूट झाला. आयपीएलच्या १६ व्या सीजनमध्ये १० टीम खेळत असून फोटोशूटमध्ये १० पैकी ९ कर्णधार उपस्थित राहिल्याने रोहित शर्माबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…म्हणून रोहित शर्मा फोटोशूटला उपस्थित राहिला नाही

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या फोटोतून गायब होता. रोहित शर्मा कुठे आहे? असा प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडला होता. पण आता या सर्व प्रश्नांना पूर्णविराम लागणार आहे. कारण रोहित शर्माबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. टीओआईच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माची प्रकृती ठीक नसल्याने तो आयपीएलच्या प्री सीजन मीटमध्ये उपस्थित राहू शकला नाही. तसंच या फोटोशूटमध्ये भुवनेश्वर कुमारही उपस्थित होता, एडन मार्करमच्या अनुपस्थित भुवनेश्वर सनरायजर्सचं नेतृत्व करणार आहे. याशिवाय श्रेयस अय्यरच्या जागेवर कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा नितीश राणाही या फोटोशूटमध्ये सहभागी झाला होता. पण रोहितबाबत सांगण्यात आलं की, त्याची तब्येत ठीक नव्हती आणि याच कारणामुळं तो अहमदाबादला पोहोचू शकला नाही. पण टीमच्या पहिल्या सामन्यात रोहित उपस्थिती दर्शवू शकतो, असंही सांगण्यात आलं आहे.

रोहित सुरुवातीचे सामने खेळणार नाही?

रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि त्याला आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, एशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपसारखे महत्वाच्या टूर्नामेंट खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत त्याला कामाचा भार सांभाळणे अनिवार्य आहे. याच कारणास्तव सांगितलं जात आहे की, रोहित आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे. याबाबत टीमचे कोच मार्क बाउचरने म्हटलं होतं की, ते रोहितला काही सामन्यांमध्ये विश्रांती देऊ शकतात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why mumbai indians skipper rohit sharma did not participate in ipl 2023 teams captains photoshoot know the reason nss