Wasim Akram Statement On Virat Kohli : पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम आक्रमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विशेषत: एम धोनीच्या कॅप्टन्सीवर खास टीप्पणी केली आहे. आयपीएलमध्ये आरसीबीचा संघाने आतापर्यंत आयपीएलचे जेतेपद एकदाही जिंकले नाही. आधी विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होता. परंतु, संघाला एकदाही जेतेपद जिंकवून दिलं नाही. आता बंगळुरुचं नेतृत्व फाफ डु प्लेसिस करत आहे. या सीजनमध्येही आरसीबी संघर्ष करत आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी ९ मे ला होणाऱ्या सामन्यात आरसीबीला जिंकणं अनिवार्य आहे. अशातच अक्रमने आरसीबीच्या संघाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अक्रम स्पोर्ट्सक्रीडशी बोलताना म्हणाला, आरसीबीचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी असता तर, आरसीबी आतापर्यंत चार-पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकली असती. विराटने खूप मेहनत घेतली आणि प्रयत्न केले. परंतु, सर्वच खेळाडूंनी प्रयत्न करण्याची गरज होती. मला असं वाटतं की, या कारणामुळंच आरसीबीचा संघ आतापर्यंत किताब जिंकला नाही.
अक्रम पुढे बोलताना म्हणाला, धोनीकडे भारताचं नेतृत्व करण्याचा अनुभव होता. ज्याचा फायदा त्यांना आयपीएलमध्ये झाला. आता कोहलीलाही नेतृत्व करण्याची सवय झाली आहे. पंरतु, तो शांत नाहीय. पण तो शांत असल्यासारखा दाखवतो. जेव्हा खेळाडू पाहतात की, त्यांचा कर्णधाक कूल आहे आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक वाढतो. धोनी असा कर्णधार आहे, जो खेळाडूंचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. याच कारणामुळं धोनीनं सीएसकेला आयपीएलमध्ये चारवेळा जेतेपद जिंकून दिलं.