Pahalgam Terror Attack SRH vs MI IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये आज मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवला जात आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत आहे. मुंबई आणि हैदराबाद सामन्याची नाणेफेक झाली असून मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यादरम्यान खेळाडू काळी पट्टी हातावर बांधून उतरणार आहेत. फक्त भारतीयच नव्हे तर दोन्ही संघातील प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणारे सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधणार आहेत. इतकंच नव्हे तर कॉमेंट्री पॅनलमधील समालोचकही काळी पट्टी बांधणार आहेत.

भारताच्या काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक भारतीय पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. देशभर आणि जगभरात या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. आयपीएल २०२५ दरम्यान देखील खेळाडू आणि कॉमेंटेटर्सने आपला जाहीर निषेध व्यक्त केला आहे. दोन्ही संघातील खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली आहे.

इतकंच नव्हे तर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू आणि संपूर्ण स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी एक मिनिट उभं राहत या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. या सामन्यादरम्यान डीजे आणि चिअरलीडर्सदेखील नसणार आहेत. मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत पॉवरप्लेमध्येच हैदराबादच्या बड्या फलंदाजांना बाद करत दणक्यात सुरूवात केली आहे.