Anushka Sharma upset after Virat’s dismissal against KKR: आयपीएल २०२३ चा ३६ वा सामना बुधवार, २६ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चार सामन्यांच्या पराभवानंतर केकेआरने अखेर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला विजय नोंदवला. या सामन्यात कोलकाताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात आश्चर्यकारक कामगिरी केली. केकेआरने आरसीबीचा सामना २१ धावांनी जिंकला. या सामन्यात केकेआरने विराट कोहलीला बाद करताच आपला विजय निश्चित केला होता, यानंतरअनुष्का शर्माची रिअॅक्शन व्हायरल होत आहे.

संपूर्ण सामन्यात केकेआरचे वर्चस्व राहिले यात शंका नाही. पण आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या अप्रतिम फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. कोहलीच्या फलंदाजीने केकेआर आणि त्यांच्या चाहत्यांचा जीव काही काळ टांगनीला लावला होता. पण व्यंकटेश अय्यरच्या अप्रतिम झेलने कोहलीचा डाव संपुष्टात आला. विराट बाद झाल्यानंतर स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी अनुष्का शर्माची रिअॅक्शन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…

हेही वाचा – IPL 2023 RCB vs KKR: आरसीबीने मोडला आयपीएलचा सर्वात लाजिरवाणा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावर निराशा दिसली –

वास्तविक, आरसीबीच्या डावातील १३ वे षटक केकेआरकडून आंद्रे रसेल टाकत होता. रसेलच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहली स्ट्राइकवर होता. रसेलने कोहलीला एक शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर कोहलीने पुल शॉट खेळून पूर्ण ६ धावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडूला योग्य टाईम करु शकला नाही, त्यामुळे सीमारेषेवर तैनात व्यंकटेश अय्यरने अप्रतिम झेल घेत विराटला बाद केले.

हेही वाचा –

विराट बाद होताच कॅमेरामनने कॅमेरा स्टँडमध्ये बसलेल्या विराटची पत्नी अनुष्का शर्मावर केंद्रित केला. विराट बाद झाल्यानंतर अनुष्का खूपच उदास दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. तिची ही रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय विराट कोहलीबद्दल बोलायचे झाल्यास, विराटने १४५ च्या स्ट्राइक रेटने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ६ चौकार पाहायला मिळाले.

Story img Loader