पहिल्या मोसमातील पहिल्या सामन्यासाठी सनरायजर्स हैदराबादचा संघ सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात त्यांची घरच्याच मैदानात गाठ पडेल ती पुणे वॉरियर्सची. कुमार संगकारासारखा अनुभवी कर्णधार सनरायजर्सला मिळाला असून डॅरेन सॅमीसारखा ट्वेन्टी-२० विजेता कर्णधारही संघात आहे. दुसरीकडे पुण्याच्या संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क दुखापतीने बेजार असल्याने त्याच्या जागी अँजेलो मॅथ्यूज संघाची धुरा वाहणार आहे.
संगकारा आणि सॅमी सनरायजर्समध्ये असल्याने त्यांची ‘थिंक टँक’ चांगलीच असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीचा बादशहा डेल स्टेन संघात असल्याने त्यांच्या गोलंदाजीला चांगली धार असेल. सलामीवीर आणि गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्मात असलेला शिखर धवन हा दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे. संगकाराबरोबर कॅमेरुन व्हाइट, नॅथन मॅक्क्युलमसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संघात आहेत. संगकाराबरोबर सलामीला पार्थिव पटेल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोलंदाजीमध्ये स्टेन, सॅमी आणि इशांत शर्मा हे प्रतिस्पर्धी फलंदाजांना धारेवर धरतील. त्याचबरोबर संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे संघात चांगलाच समतोल दिसून येतो. या युवा खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळाल्यास त्यांची कामगिरी चांगली होऊ शकते.
पुणे वॉरियर्सच्या संघात क्लार्क नसला तरी युवराज सिंगसारखा ‘मॅचविनर’ खेळाडू आहे. त्याचबरोबर रॉबिन उथप्पा, रॉस टेलर, स्टीव्ह स्मिथ, मालरेन सॅम्युअल्स, अजंथा मेडिस, ल्यूक राइटसारखे आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव असलेले खेळाडू संघात आहेत. त्याचबरोबर यंदाच्या रणजी मोसमात सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करणारा अभिषेक नायर कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
पुण्याच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगला समतोल पाहायला मिळतो. फलंदाजीची धुरा युवराज, उथप्पा, टेलर यांच्या खांद्यावर असेल; तर मनीष पांडे, धीरज जाधवसारखे युवा फलंदाजही संघात आहेत. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, श्रीकांत वाघसारखे युवा वेगवान गोलंदाज संघात आहे. कर्णधार मॅथ्यूज हा नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहेच, त्याचबरोबर सॅम्युअल्स आणि अभिषेक हे अष्टपैलू खेळाडू त्याला चांगली साथ देतील. अजंथा मेंडिससारखा नावाजलेला फिरकीपटूही त्यांच्या संघात असून त्याला अमित मिश्राची चांगली साथ मिळेल.
दोन्ही संघावर नजर टाकली तर सनरायजर्सपेक्षा पुण्याचा संघ थोडासा उजवा वाटत आहे. पण सनरायजर्सचा पहिलाच सामना असल्याने त्यांच्या खेळाबद्दलचा अंदाज कोणालाच नाही. त्यामुळे शुक्रवारी या दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळेल.
सनरायजर्सची विजयाची पहाट उगवणार का?
पहिल्या मोसमातील पहिल्या सामन्यासाठी सनरायजर्स हैदराबादचा संघ सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात त्यांची घरच्याच मैदानात गाठ पडेल ती पुणे वॉरियर्सची. कुमार संगकारासारखा अनुभवी कर्णधार सनरायजर्सला मिळाला असून डॅरेन सॅमीसारखा ट्वेन्टी-२० विजेता कर्णधारही संघात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-04-2013 at 04:50 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sunraisers win