Kane Williamson Ruled out of ICC World Cup 2023: आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळणारा केन विल्यमसन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला सपोर्ट स्टाफच्या मदतीने मैदानाबाहेर जावे लागले. त्याचवेळी, या दुखापतीनंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की त्याचे क्रूसिएट लिगामेंट फाटले आहे आणि त्यातून बरे होण्यासाठी त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्याचवेळी, या दुखापतीच्या काळात न्यूझीलंड संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. वास्तविक, या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातूनही बाहेर जाऊ शकतो.
आयपीएल २०२३च्या मध्यावर खूप दुःखद बातमी आली
केन विल्यमसन दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंडला परतला होता आणि मंगळवारी त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे स्कॅनद्वारे पुष्टी करण्यात आली. अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्सकडून क्षेत्ररक्षण करताना केन विल्यमसनला दुखापत झाली होती. न्यूझीलंड क्रिकेटच्या विधानानुसार उजव्या हाताच्या या फलंदाजावर पुढील तीन आठवड्यांत शस्त्रक्रिया केली जाईल. ही बातमी मिळाल्यानंतर केन विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेट आणि आयपीएल फ्रँचायझीचे आभार मानले.
हा दिग्गज क्रिकेटर २०२३ विश्वचषकातून बाहेर!
केन विल्यमसन म्हणाला, “मला पूर्वी खूप पाठिंबा मिळाला आणि त्यासाठी मी गुजरात टायटन्सचे आभार मानतो. अशा दुखापतीमुळे मी निराश होणे स्वाभाविक आहे, पण माझे लक्ष आता शस्त्रक्रियेवर आणि त्यानंतर पुन्हा फिटनेसकडे जाण्यावर आहे. यास थोडा वेळ लागेल, पण मी शक्य तितक्या लवकर मैदानात परतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. अशा दुखापतीतून बरे होऊन पूर्ण तंदुरुस्तीकडे परत येण्यासाठी बराच वेळ लागतो आणि विल्यमसनकडे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये २०२३ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त राहणे अशक्य वाटते.”
२०२३चा विश्वचषक खेळण्याची संधी गेली!
केन विल्यमसन म्हणाला, “मी पुढील काही महिन्यांत मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड आणि संघाला कसा पाठिंबा देऊ शकतो यावर मी लक्ष केंद्रित करत आहे.’ न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टीड यांनाही असे वाटते की २०२३ च्या विश्वचषकापूर्वी विल्यमसनला तंदुरुस्त होणे कठीण होईल असे वाटते.” केन विल्यमसन म्हणाला, “आम्ही आशा सोडलेली नाही पण सध्याची परिस्थिती पाहता हे अशक्य वाटते. आमच्या भावना सध्या केनसोबत आहेत. त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. तुम्हाला ज्या प्रकारची दुखापत अपेक्षित होती ती अशी नाही. हा खरोखरच धक्का आहे.”