ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आगामी विश्वचषकासाठी मोठी भविष्यवाणी केली आहे. २००३ आणि २००७ मध्ये कांगारू संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या पाँटिंगने भारतीय संघात ऋषभ पंतच्या जागी दोन खेळाडूंचा समावेश केला आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे सध्याचे प्रशिक्षक म्हणाले की, “सूर्यकुमार यादव हा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या जागी केएल राहुल सध्या वनडेत यष्टिरक्षण करत आहे. त्याचा पर्याय म्हणून इशान किशनची निवड करण्यात आली आहे. पाँटिंगही या दोन खेळाडूंबाबत सहमत आहे. ‘द आयसीसी’ रिव्ह्यूमध्ये संजना गणेशन यांच्याशी संवाद साधताना तो म्हणाला, “मला वाटते की या दोन खेळाडूंसह भारत पुढे जाईल. विश्वचषक संघात राहुल निश्चित असेल.”

हेही वाचा: IPL 2023: जबरदस्त! मराठमोळ्या शार्दुलच्या खेळीवर शाहरूखची लेक झाली फिदा, म्हणाली की, “मला खूप आनंद…”

राहुल आणि इशान विश्वचषक संघात असतील: पाँटिंग

पाँटिंग पुढे म्हणाला, “इशान किशनला डावखुरा फलंदाज म्हणून प्लेइंग-११ मध्ये ठेवता येईल. टीम इंडियाला पंतच्या अनुपस्थितीत डाव्या हाताचा विशेषज्ञ फलंदाज हवा आहे. तो चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघात राहुल आणि इशानचा समावेश होईल, अशी माझी भावना आहे. मैदानातील यावेळेची परिस्थिती आणि विरोधी संघ पाहून प्लेइंग-११ मध्ये कोणाला ठेवायचे याचा निर्णय होईल.”

सूर्यकुमारला पाँटिंगची साथ लाभली

भारतीय संघाने सूर्यकुमार यादवची निवड करावी, असे पाँटिंगचे मत आहे. तो एक असा खेळाडू आहे जो विश्वचषक जिंकू शकतो. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत तो सलग तीन डावात बाद झाला होता. तो टी२० मध्ये जबरदस्त खेळ दाखवत आहे, पण एकदिवसीय मध्ये त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. अशा स्थितीत त्याचे विश्वचषक संघातील स्थान धोक्यात आले आहे.

हेही वाचा: IPL 2023: मुंबईत चेन्नई सुपर किंग्जचे जंगी स्वागत! महाराष्ट्राच्या आदरातिथ्याने भारावला धोनी, फ्रँचायझीने शेअर केला खास VIDEO

पाँटिंग म्हणतो की, “जर त्याला वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडायचा असेल तर तो नक्कीच सूर्यकुमारची निवड करेल. पाँटिंग म्हणाला, “सर्व खेळाडू त्यांच्या कारकिर्दीत या टप्प्यातून जातात. मला आठवत नाही की मी शेवटच्या वेळी एखाद्याला सलग तीन सामन्यांमध्ये शून्यावर आऊट झाल्याचे पाहिले होते, परंतु यामुळे कोणत्याही खेळाडूला कमी महत्त्व नाही. करिअरमध्ये असे प्रसंग येतच राहतात. सूर्यकुमारसाठी गेले १२ ते १८ महिने जबरदस्त होते. तो मर्यादित षटकांत काय करू शकतो हे सर्वांनाच माहीत आहे.”