PBKS vs GT: गुजरात टायटन्सचा वृद्धिमान साहा हा आयपीएल २०२३ मध्ये खेळणारा सर्वात अनुभवी यष्टीरक्षक आहे. गुजरातला दमदार सुरुवात करण्याबरोबरच तो विकेटच्या मागेही चमत्कार करतो. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर, तो कसोटीत टीम इंडियाचा आघाडीचा यष्टीरक्षक होता. मात्र गेल्या वर्षी त्याला संघातून वगळण्यात आले होते. यानंतरही साहा आयपीएलमध्ये सतत आश्चर्यकारक कामगिरी करत आहे.हार्दिक पांड्या वृद्धिमान साहावर चिडला तरीही तो झुकला नाही. त्याने त्याचा हट्ट पुढे नेट डीआरएस घेण्यास भाग पाडले. त्यात फलंदाज धावचीत झाला आणि अंपायरलाही निर्णय बदलण्यास भाग पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डीआरएससाठी कर्णधाराचे मन वळवले

आयपीएलच्या १८व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. गुजरातकडून मोहित शर्माने १३वे षटक टाकले. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माने झेल घेतला. त्याला चकमा देताना चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला. साहा यांनी जोरदार आवाहन केले. पण गोलंदाजासह आजूबाजूचे सर्व खेळाडू शांत होते. जितेशच्या बॅटला चेंडू लागला याची साहाला पूर्ण खात्री होती. त्याने कर्णधार हार्दिक पांड्याकडून डीआरएसचा आग्रह धरला. त्याला कोणीही साथ दिली नाही पण साहाने त्याच्यावर डीआरएस घेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.

हार्दिक पांड्यालाही आपल्या सर्वात वरिष्ठ खेळाडूची मागणी मान्य करावी लागली. डीआरएस घेण्यासाठी १५ सेकंदांचा अवधी असताना शेवटच्या क्षणी जाऊन हार्दिकने रिव्ह्यूसाठी इशारा केला. चेंडू जितेश शर्माच्या बॅटला लागल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले. अंपायरने आपला निर्णय बदलला पंजाबला चौथा धक्का बसला. पण त्याआधी तो साहावर चिडला आणि म्हटला की, “मी कर्णधार आहे आणि माझ्या डीआरएसच्या इशाऱ्यानंतरच अंपायर थर्ड अंपायरकडे जाईल.”

हार्दिक सातत्याने डीआरएस घ्यायच की नाही असे साहाला विचारत होता आणि त्यासाठीचे १५ सेकंदाची संपत चालली होती. शून्य असे आल्यानंतर हार्दिकने डीआरएसची मागणी केली. आपण उशीर केला याची जाणीव पांड्याला झाली आणि त्याने डोक्याला हात मारून घेतला. पण, अंपायरने गुजरातला DRS दिला अन् त्यावर पंजाबची विकेट पडली. वेळ संपल्यानंतरही हार्दिकला DRS दिल्याने वाद सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा: IPL 2023 PBKS vs GT: पंजाबचे फलंदाज केवळ कागदावरच किंग; गुजरातसमोर विजयसाठी १५४ धावांचे माफक आव्हान

गुजरातचे १५४ धावांचे लक्ष्य

या सामन्यात गुजरात टायटन्सने शानदार गोलंदाजी करत पंजाब किंग्जला १५३ धावांत रोखले. प्रथम खेळण्यासाठी उतरलेल्या पंजाबला पहिल्याच षटकात प्रभासिर्मन सिंगच्या रूपाने मोठा धक्का बसला. शिखर धवनलाही केवळ ८ धावा करता आल्या. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. संघाकडून मोहित शर्माने ४ षटकांत १८ धावा देत २ बळी घेतले.