Yash Dayal Comeback Story after Rinku Singh 5 Sixes to RCB Win Hero: आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सला नमवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. २१९ धावांचे लक्ष्य देत आऱसीबीने चेन्नईला १९१ धावांवर रोखले आणि २७ धावांनी मोठा विजय मिळवला. हा आरसीबीचा सलग सहावा विजय ठरला आणि या सामन्यात संघासाठी तारणहार ठरला तो म्हणजे यश दयाल. हो यश दयाल ज्याच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये पाच षटकार ठोकले होते. रिंकूचे ते ५ षटकार आणि त्यानंतर खचलेला यश दयाल ते आऱसीबीसाठी २०वे षटक टाकत विजय मिळवून देणाऱ्या या गोलंदाजाने आपले कौशल्य दाखवून दिले.

यश दयालने आरसीबीसाठी २० वे षटक टाकले ज्यात त्याने ७ धावा दिल्या. फक्त पहिल्या चेंडूवरील धोनीचा षटकार आणि शार्दुल ठाकूरची एक धाव सोडता त्याने चार चेंडू डॉट बॉल टाकले. २० व्या षटकात जडेजासारखा विस्फोटक फलंदाज समोर असताना त्याला डॉट बॉल टाकणं ही मोठी गोष्ट आहेच पण यातून गोलंदाजाचे कसबही दिसून येते. चेन्नईला क्वालिफाय होण्यासाठी १७ धावांची गरज होती, पण यशने अवघ्या ७ धावा दिल्या. पण त्याने धोनीलाही झेलबाद केले.

traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
dombivli railway police returned jewellery to woman forget in local train
लोकलमध्ये विसरलेले तीन लाखाचे दागिने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडून दिव्याच्या महिलेला परत
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Pimpri, pimpri chinchwad, rickshaw accident, potholes, road disrepair, municipal corporation, Nigdi police
पिंपरी : खड्ड्याने घेतला महिलेचा जीव
Will Nifty touch the high mark of 25500
‘निफ्टी’ २५,५०० च्या थराची दहीहंडी फोडणार का?
rickshaw driver beaten, rickshaw Thakurli,
Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत

हेही वाचा – RCB in Playoffs: यश दयाळ ठरला आरसीबीचा तारणहार: बलाढ्य चेन्नईला नमवत प्लेऑफ्समध्ये

यश दयालचे २०वे षटक
पहिला चेंडू – धोनीचा षटकार
दुसरा चेंडू – धोनी सीमारेषेवर झेलबाद अन् आऱसीबीचे सामन्यात पुनरागमन
तिसरा चेंडू – डॉट बॉल
चौथा चेंडू – शार्दुल ठाकूर १ धाव
पाचवा चेंडू – रवींद्र जडेजा, डॉट बॉल
सहावा चेंडू – रवींद्र जडेजा, डॉट बॉल अन् आरसीबीचा विजय

रिंकूच्या ५ षटकारांनंतर यश दयालने कसं केलं कमबॅक?

यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार मारला आणि लगेचच आठवले २०२३ च्या आयपीएलमधील रिंकूचे ते ५ षटकार. आयपीएल २०२३ मध्ये कोलकाताला शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सविरुद्ध विजयासाठी २९ धावा करायच्या होत्या. उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एकेरी घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर पोहोचलेल्या रिंकूने धुमाकूळ घातला. त्याने २०व्या षटकांत यश दयालच्या शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्यामुळे एका षटकात ३१ धावा दिल्याने यश दयाल चांगलाच खचला होता. इतकेच नव्हे तर यश रडतानाही दिसला. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये गुजरातने त्याला प्लेईंग इलेव्हनमध्येही सामील केले नाही.

यश दयालला हे ५ षटकार पचवता न आल्याने त्याच खूप दडपण घेतलं. यामुळे यश नंतरचे १० दिवस आजारी होता, त्याच्या खाण्यापिण्यावरही याचा परिणाम झाला. यामुळेच यशचे ८ ते १० किलो वजनही घटलं होतं अशी माहिती हार्दिक पंड्याने आय़पीएल २०२३ च्या सामन्यांमध्ये दिली होती. यानंतर एका सामन्यात गुजरातने त्याला खेळण्याची संधी दिली. पण आयपीएल २०२३ नंतर त्यांनी यशला रिलीज केले. २०२४ च्या हंगामापूर्वीच्या लिलावात आरसीबीने त्याच्यावर बोली लावली.

आरसीबीने लिलावात तब्बल ५ कोटी रूपये खर्चून त्याला संघात घेतले. आरसीबीने त्याला संघात घेताना अनेकांनी प्रश्नचिन्ह उभारले की रिंकूने त्याला ५ षटकार मारले त्याला संघात कसं घेणार. पण आपल्या कामगिरीने त्याने आता सर्वांची बोलती बंद केली. यश दयालने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२ सामन्यांत ८.२० च्या इकोनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या आहेत. २० चेंडूत ३ विकेट्स ही त्याची गोलंदाजीची सर्वाेक्तृष्ट संख्या आहे. तर आजच्या सामन्यातही यशने ४ षटकात २ विकेट्स घेतल्या. डॅरिल मिचेल आणि एम एस धोनी त्याचे बळी ठरले. पण हे पुनरागमन करणं यशसाठी सोपं नव्हतं खचलेल्या यशला त्याच्या वडिलांनी उभारी दिली. अनेक क्रिकेटपटूंची उदाहरण देत त्याला पुन्हा उभ राहण्यात मदत केली.

आऱसीबीच्या विजयानंतर कर्णधार फॅफ डू प्लेसिसला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितलं की मी माझा सामनावीराचा पुरस्कार यश दयालला समर्पित करत आहे.