Yash Dayal advised by father Chandrapal: रविवारी आयपीएल २०२३ मध्ये रिंकू सिंगने अशक्य ते शक्य करुन दाखवले. कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्ध शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती. रिंकूने यश दयालच्या षटकात सलग ५ षटकार ठोकत विजय मिळवून दिला. त्यानंतर एकीकडे रिंकू आणि कोलकाताचे खेळाडू सेलिब्रेशन करत होते, तर दुसरीकडे यशच्या डोळ्यात अश्रू आले होते. यामुळेच सोमवारी त्यांचे वडील चंद्रपाल दयाल यांनी आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानपत्राला हात लावला नाही. सकाळच्या वर्तमानपत्राने ते दिवसाची सुरुवात करतात. त्यांना आपल्या मुलाचे रडतानाचे फोटो पहायचे नव्हते. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटही पाहिले नाही.
स्टुअर्ट ब्रॉडसह इतर गोलंदाजांची उदाहरणे दिली –
रिंकू सिंग आणि यश दयाल हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. यशचे वडील प्रयागराजचे रहिवासी चंद्रपाल यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर टी. व्ही.बंद केला, तर अलीगढमधील रिंकूच्या घरी जल्लोष करण्यात आला. यश मैदानावर बसून रडत असल्याचे त्यांना त्याच्या जवळच्या लोकांकडून समजले. चंद्रपाल यांना आपल्या मुलाची काळजी वाटू लागली. यश जास्त बोलत नाही आणि त्याच्या भावना व्यक्तही करत नाही. यामुळे चंद्रपाल चिंतेत होते. त्यांनी यशशी फोनवर बोलून २००७ च्या टी-२० विश्वचषकात सहा षटकार मारणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडसह इतर गोलंदाजांची उदाहरणे देऊन त्याला प्रोत्साहन दिले. ब्रॉडला टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने सहा षटकार ठोकले होते.
चंद्रपाल यांनी काकू, काका आणि चुलत बहिण यांना यशला भेटायला पाठवले –
फोनवर बोलण्यापूर्वी चंदरपाल यांनी यशची काकी, काका आणि चुलत भाऊ यांना टीम हॉटेलमध्ये पाठवले, जे सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते. चंद्रपाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “मी त्यांना सांगितले तुम्ही जा आणि त्याला प्रोत्साहन द्या. त्याचे मनोबल वाढवा. तो दु:खी असेल. तो खूप कमी बोलतो. तो अंतर्मुख आहे आणि अशा परिस्थितीतही तो कोणाला काही बोलणार नाही.”
हेही वाचा – IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज खेळाडू अडकला विवाहबंधनात; स्वत: फोटो शेअर करत दिली माहिती
यशचा पुढचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणार –
चंद्रपॉल हे वेगवान गोलंदाज होते, जे ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात विझी ट्रॉफीमध्ये खेळले आहेत. यशशी बोलण्याआधी त्याला सानरायचं होतं. ते म्हणाले, “मी क्रिकेटर झालो आहे, पण पालक होणे ही वेगळी गोष्ट आहे. मी जरा उदास झालो, ‘का झालं, कसं झालं, माझ्या मुलाची काळजी वाटली.’ या कठीण काळात आपल्या मुलाच्या पाठीशी उभे राहायचे असे त्यांनी ठरवले आणि पुढचा सामना पाहण्यासाठी ते स्टेडियममध्ये जाणार आहेत. यानंतर त्यांनी यशला फोन केला.
चंद्रपाल यशला काय म्हणाला?
चंद्रपालने फोन केला तेव्हा काका-काकूंच्या प्रोत्साहनाने यश काहीसा सावरला होता. भारताकडून खेळून स्टार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्याच्या एका ओव्हरचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या तरुण मुलाला वडील काय म्हणतील? ते यशला म्हणाला, “काळजी करू नकोस. क्रिकेटमध्ये ही काही नवीन गोष्ट नाही. गोलंदाजांना मार बसतो. मोठमोठ्या गोलंदाजांसोबत असे घडले आहे. फक्त मेहनत कर, तू कुठे चुका केल्या ते पहा, पण लक्षात ठेवा क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ नाही. मलिंगा, स्टुअर्ट ब्रॉडसारखे मोठे खेळाडू अशा परिस्थितीतून गेले आहेत”.
हेही वाचा – IPL 2023: सलग ५ षटकार खाणाऱ्या यश दयालने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसरा गोलंदाज
त्यानंतर १३ तारखेला मोहाली येथे होणाऱ्या पुढील सामन्यात पोहोचणार असल्याचे त्यांनी यशला सांगितले. ते म्हणाले, “मी त्याला सांगितले की मी तुझ्याकडे येत आहे, मी तुझ्याबरोबर आहे… तो पुनरागमन करेल. मला आशा आहे की अशी काळी रात्र त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. तो जोरदार पुनरागमन करेल. ”