Yash Dayal breaking Ishant Sharma’s embarrassing record: आयपीएल २०२३ मध्ये, रविवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रंजक होता, ज्यामध्ये केकेआरने रिंकू सिंगच्या दमदार खेळीच्या जोरावर ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंगने यश दयालविरुद्ध सलग ५ षटकार ठोकून सामन्याची दिशा बदलून टाकली. दरम्यान या सामन्यात यश दयालच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
कोलकाताला शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सविरुद्ध विजयासाठी २९ धावा करायच्या होत्या. उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एकेरी घेतली.अशा स्थितीत दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर पोहोचलेल्या रिंकूने धुमाकूळ घातला. त्याने २०व्या षटकांत यश दयालच्या शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत आपल्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्यामुळे एका षटकात ३१ धावा देत यश दयालने आयपीएलमध्ये एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे, तो आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा देणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
यश दयालने इशांत शर्माला मागे टाकले –
रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारले. त्यामुळे यश दयालने एका षटकात सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत इशांत शर्माला मागे टाकले आहे. यासह, तो आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. जिथे इशांत शर्माने एका डावात (४ षटकात) ६६ धावा दिल्या होत्या, तिथे आता यश दयालने ६९ धावा देत इशांतचा विक्रम मोडला आहे.
आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज –
०/७० – बेसिल थंपी (एसआरएच) विरुद्ध आरसीबी, बंगळुरू, २०१८
०/६९ – यश दयाल (जीटी) विरुद्ध केकेआर, अहमदाबाद, २०२३
०/६६ – इशांत शर्मा (एसआरएच) विरुद्ध सीएसके, हैदराबाद, २०१३
०/६६ – मुजीब उर रहमान (केएक्सआयपी) वि एसआरएच, हैदराबाद, २०१९
०/६५ – उमेश यादव (डीसी) विरुद्ध आरसीबी, दिल्ली, २०१३
पूर्ण सामन्याची स्थिती –
या सामन्यात गुजरातने प्रथम खेळताना २० षटकात २०४ धावा केल्या. २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला शेवटच्या षटकात २९ धावा कराच्या होत्या. २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सहकारी उमेश यादवने सिंगल घेत रिंकू सिंगला स्ट्राइक दिली. यानंतर या खेळाडूने पुढच्या ५ चेंडूत ५ षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.