Yashasvi Jaiswal breaks Shaun Marsh’s record: आयपीएल २०२३ मध्ये, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने खूप प्रभावित केले आहे. प्लेऑफच्या शर्यतीत पंजाब किंग्जविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्याने ३६ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने इतिहास रचला. अनकॅप्ड खेळाडू म्हणून तो एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शॉन मार्शचा विक्रम मोडला. मार्शने हा विक्रम २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात पंजाब किंग्ज (तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाब) कडून खेळताना केला होता.

त्यानंतर शॉन मार्शने ६१६ धावा केल्या होत्या. यशस्वीने १४ सामन्यांत ४८.०८ च्या सरासरीने आणि १६३.६१ च्या स्ट्राईक रेटने ६२५ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल मोसमात ६०० धावा करणारा यशस्वी हा २५ वर्षांखालील चौथा फलंदाज ठरला. या यादीत एकच विदेशी खेळाडू आहे. शॉन मार्श व्यतिरिक्त ऋषभ पंतने २०१८ मध्ये ६८४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडने २०२१ मध्ये ६३५ धावा केल्या होत्या. पंत आणि जैस्वाल यांनी २२ वर्षांचे होण्यापूर्वी ही कामगिरी केली.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती

वानखेडेवर यशस्वी जैस्वालने शतक झळकावले –

यशस्वी जैस्वालनेही या मोसमात एक शतक झळकावले आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२४ धावांची खेळी खेळली. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर त्याने ही खेळी खेळली. या मोसमात सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा तो संयुक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने ५ अर्धशतके केली आहेत.

हेही वाचा – RR vs PBKS: दुसऱ्याच चेंडूवर प्रभसिमरन झाला बाद, ट्रेंट बोल्टने घेतला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

यशस्वी जैस्वालने सर्वाधिक चौकार मारले –

यशस्वी जैस्वालने या मोसमात आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या केली आहे. त्याने मुंबईविरुद्ध ६२ चेंडूत १२४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने १६ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याने आतापर्यंत एकूण २६ षटकार मारले आहेत. तसेच त्याने सर्वाधिक चौकार मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने ८२ चौकार मारले आहेत. या यादीत शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६२ चौकार मारले आहेत.

Story img Loader