Yashasvi Jaiswal broke Virat Kohli’s record: आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने कोलकात्याचा ९ गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या विजयात यशस्वी जैस्वालचे महत्त्वाचे योगदान होते. या सामन्यात यशस्वी जैस्वालने ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीने अनेक विक्रम मोडीत काढले. दरम्यान यशस्वी जैस्वालने टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.
गुरुवारी यशस्वी जैस्वालची फलंदाजी पाहून सगळेच अवाक् झाले. डावाच्या पहिल्याच चेंडूपासून यशस्वी जयस्वालने केकेआरच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दरम्यान, त्याने विराट कोहलीच्या एका विक्रमाची बरोबरी केली आणि एक विक्रम मोडला आहे. हा केवळ असा विक्रम नव्हता. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट जगातील एकमेव फलंदाज होता. पण आता त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला बरोबरी आहे.
विराट कोहलीचा विक्रम मोडला –
विराट कोहलीला आपला आदर्श मानणाऱ्या यशस्वी जैस्वालने केकेआरविरुद्ध त्याचा एक विक्रम मोडला. खरं तर, २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने डावातील पहिल्या तीन चेंडूवर सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारले होते आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली होते. अशा प्रकारे त्याने १३ धावा केल्या होत्या. परंतु यशस्वी जैस्वालने केकेआर विरुद्ध पहिल्या तीन चेंडूत १६ धावा कुटल्या. ज्यामध्ये त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. तो आयपीएलमधील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने डावातील पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारत विराटच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
हेही वाचा – RR vs KKR: जोस बटलरला बीसीसीआयने ठोठावला दंड; कोलकाताविरुद्धच्या सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात
विराटने यशस्वी जैस्वालचे कौतुक केले –
केकेआरविरुद्ध यशस्वी जयस्वालची खेळी पाहून विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले. या सामन्यात यशस्वी जैस्वालने अवघ्या १३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जे आयपीएस इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी केएल राहुलने आयपीएलमध्ये १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात यशस्वी जैस्वालने आपले अर्धशतक पूर्ण करताच विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर आपली स्टोरी पोस्ट केली आणि लिहिले की अलीकडच्या काळात यापेक्षा चांगली खेळी पाहिली नाही. यशस्वी जैस्वाल तू स्टार आहेस. विराट कोहलीच्या या स्टोरीवर प्रतिक्रिया देताना यशस्वी जैस्वालने लिहिले की धन्यवाद भाऊ.
हेही वाचा – Virat Kohli: ‘धोनीकडून शिकलो प्रत्येकाला खूश…’; विराटच्या मुलाखतीचा VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालने अनेक विक्रम केले –
या सामन्यात यशस्वी जैस्वालने केवळ एकच विक्रम केला नाही. तसेच तो आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आपल्या डावातील पहिल्याच षटकात २६ धावा दिल्या, जे आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय एका सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. या सामन्यात त्याने पॉवरप्लेमध्ये ६२ धावा केल्या. या सामन्यात त्याचे शतक हुकले असले तरी या सामन्यात जयस्वालने सर्वांची मने जिंकली.