Yashasvi Jaiswal Records In IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रंगला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेला राजस्थानचा सलामीवीर युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलरने संघाला चांगली सुरुवात करून दिली. याचदरम्यान जैस्वालने त्याच्या आयपीएल करिअरमधील एक हजार धावा पूर्ण केल्या. हा पराक्रम करत जैस्वालने दोन खास विक्रमांना गवसणी घातली आहे.

एसआरएस विरुद्ध झालेल्या सामन्यात जैस्वालला आयपीएल करिअरमधील एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी ११ धावांची आवश्यकता होती. ज्या त्याने सामन्याच्या सुरुवातीलाच केल्या. जैस्वालने १८ चेंडूत पाच चौकार आमि दोन षटकारांच्या मदतीनं ३५ धावांची खेळी केली. डावखुरा फलंदाज जैस्वालने एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी ३४ इनिंग खेळल्या. तो या टूर्नामेंटमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये या धावांचा आकडा पार करणाऱ्या सीएसकेचा माजी फलंदाज सुरेश रैनानंतर भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजाकडून सर्वात कमी इनिंगमध्ये एक हजार धावा करण्याचा विक्रम संयुक्तपणे सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर आहे. त्यांनी हा किर्तीमान ३१ इनिंगमध्ये केला आहे.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
donald trump who is Vivek Ramaswamy
ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळालेले अब्जाधीश विवेक रामास्वामी कोण आहेत? त्यांचे भारताशी काय नाते? वाचा सविस्तर

नक्की वाचा – RR vs SRH: संदीप शर्माच्या नो बॉलवर कर्णधार संजू सॅमसनची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, “तुम्ही रेषेच्या बाहेर…”

IPL मध्ये १००० धावा कुटणारा यशस्वी जैस्वाल बनला दुसरा भारतीय युवा फलंदाज

यशस्वी जैस्वालन या मेगा लीगमध्ये सर्वात कमी वय असताना एक हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात १ हजार धावा करण्याच्या लिस्टमध्ये ऋषभ पंत पहिल्या स्थानावर आहे. त्याने २० वर्ष २१८ दिवसांचं वय असताना हा पराक्रम करून दाखवला आहे. त्यानंतर यशस्वी जैस्वालने पृथ्वी शॉला या कामगिरीत मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.