Yashasvi Jaiswal: आयपीएल २०२३ मधील ४२ सामना मुंबई आणि राजस्थान संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने ६ गडी राखून राजस्थानचा पराभव केला. आयपीएलच्या या १००० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालने पहिले शतक झळकावण्याची ऐतिहासिक संधी निवडली आणि इतिहास रचला. यशस्वी जैस्वाल आयपीएलमधील सर्वात मोठी खेळी करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध धडाकेबाज खेळी करताना १२४ धावा केल्या, जी लीगमधील अनकॅप्ड खेळाडूने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सच्या जबरदस्त वेगवान आक्रमणासमोर केवळ ६२ चेंडूत १२४ धावा केल्या, ज्यात १६ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट २०० चा होता. परंतु, यशस्वी जैस्वालचे शतक व्यर्थ गेले, कारण राजस्थान रॉयल्सने २१२ धावा करुनही त्यांना पराभूत व्हावे लागले. परंतु चांगली गोष्ट म्हणजे यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, जो त्याच्यासाठी एक संस्मरणीय क्षण ठरला.

सर्वात मोठी खेळी खेळणारा यशस्वी जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज –

वास्तविक, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळणारा यशस्वी जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज आणि सर्वात मोठी इनिंग खेळणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. जैस्वालच्या आधी २००८ च्या हंगामात, ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने पंजाबसाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११५ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध आरसीबीसाठी नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे यशस्वी जैस्वालने या सर्वांना मागे टाकले आहे.

हेही वाचा – IPL 2023 RR vs MI: ऐतिहासिक सामन्यात मुंबईचा राजस्थानवर ६ गडी राखून विजय, यशस्वी जैस्वालचे वादळी शतक ठरले व्यर्थ

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे –

या शतकामुळे जैस्वाल आयपीएल २०२३ च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात पुढे गेला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात ४२८ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने ३ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्याने आरसीबीचा सलामीवीर फाफ डुप्लेसिसला मागे टाकले आहे, ज्याने आपल्या संघासाठी ८ डावात ४२२ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत ४१४ धावा केल्या आहेत. या तिन्ही फलंदाजांनी आयपीएलच्या १६ व्या मोसमात आतापर्यंत ४०० चा टप्पा पार केला आहे. ऋतुराज गायकवाडने ३५४ आणि विराट कोहली आणि शुभमन गिलने ३३३-३३३ धावा केल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या १००० व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत २१४ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी टीम डेव्हिडने २० व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत सलग तीन षटकार मारून सामना संपवला. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालची १२४ धावांची खेळी व्यर्थ गेली. त्याचवेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५५धावा केल्या. त्यांच्याशिवाय टीम डेव्हिडने ४५ आणि कॅमेरून ग्रीनने ४४धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal has become the uncapped player with the biggest innings in ipl mi vs rr match vbm
Show comments