Yashasvi Jaiswal Tattoo: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल त्याच्या शानदार कामगिरीने चर्चेत आला आहे. जैस्वालने गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) दमदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४७ चेंडूत ९८ धावा कुटल्या. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ५ षटकार मारले. यशस्वी जैस्वालच्या आयुष्यात दोन शब्दांना खूप महत्व आहे. त्याने या दोन शब्दांचा टॅटू आपल्या हातावर बनवला आहे.

यशस्वी जैस्वालला त्याचा आदर्श विराट कोहलीप्रमाणे टॅटू बनवण्याचा छंद आहे. यशस्वीने आपल्या मनगटावर टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये त्याने ‘ट्रस्ट अँड बिलीव्ह’ असे दोन शब्द कोरले आहेत. यशस्वीच्या आयुष्यात हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. त्यांनी स्वतः याबद्दल सांगितले आहे. डाव्या हाताच्या फलंदाजाने आपला कायमस्वरूपी टॅटू का काढला हे स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

यशस्वी जैस्वालने बनवला आहे टॅटू –

यशस्वी म्हणाली, “मी पर्मनंट टॅटू बनवण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी भरवसा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. हे मला आठवण करून देत आहे की, मी कोण आहे आणि मी नेहमी माझ्यावर भरवसा आणि विश्वास का ठेवला पाहिजे. हे दोन शब्द आता माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आहेत.” गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाविरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार ठोकताना त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. राणाच्या पहिल्याच षटकात त्याने २६ धावा वसूल केल्या.

हेही वाचा – VIDEO: युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्माचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

यशस्वी जैस्वालमध्ये हा बदल झाला –

यशस्‍वीचे प्रशिक्षक ज्‍वाला सिंग आणि त्‍याच्‍या सहकाऱ्यांनी वानखेडेवर खेळायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत तो आझाद मैदानावर तंबूत राहत होता. जैस्वाल आता त्याच्या सहकाऱ्यांना तिकीट मिळवून देतो. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणाला, “जर संघ मुंबईत खेळत असेल तर, तो आम्हाला वानखेडेला उपस्थित राहण्यास सांगतो. तो बदलला नाही. फक्त एक गोष्ट बदलली आहे की तो अस्खलितपणे इंग्रजी बोलू लागला आहे.” याबद्दल यशस्वी म्हणाला, “येथे (आरआर मध्ये) सगळे इंग्रजीत बोलतात, म्हणून मी ही शिकून घेतली.”