Yashasvi Jaiswal hits five fours in one over: आयपीएल २०२३ मधील ११वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जातोय. हा सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकापासून शानदार फलंदाजी केली. जैस्वालने पहिल्याच षटकात पाच शानदार चौकार लगावले. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्याच षटकात पाच चौकार लगावले –

राजस्थान रॉयल्ससाठी सलामी द्याला जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल आले होते. यशस्वी जैस्वालने चौकार मारून सामन्याची सुरुवात केली. त्याने खलील अहमदच्या चेंडूवर अप्रतिम शॉट लगावला. यानंतरही त्याची बॅट थांबली नाही, जयस्वालने एकाच षटकांत एकापाठोपाठ पाच चौकार मारले. त्यामुळे राजस्थानला पहिल्याच षटकापासून चांगली सुरुवात मिळाली.

पहिल्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी –

राजस्थान रॉयल्सने यापूर्वीचा सामना गमावला आहे. अशा स्थितीत आज संघाला विजय मिळवायचा आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सनेही पहिले दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे दिल्लीलाही विजयाच्या ट्रॅकवर परतायला आवडेल. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर शानदार सुरुवात करुन दिली. परंतु त्यानंतर यशस्वी जैस्वाल पहिल्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केल्या नंतर बाद झाला.

हेही वाचा – IPL 2023 MI vs CSK: सीएसकेच्या ‘या’ गोलंदाजासमोर सूर्यकुमारने नेहमीच टाकली आहे नांगी, पाहा दोघांमधील हेड टू हेड आकडेवारी

यशस्वी जैस्वालचे वादळी अर्धशतक –

यशस्वी जैस्वालने बाद होण्यापूर्वी वादळी अर्धशतक झळकावले. त्याने ३१ चेंडूचा सामना करताना ११ चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला. अशा पद्धतीने ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळल्यानंतर बाद झाला. त्याला मुकेश कुमारने झेलबाद केले. त्यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसन भोपळाही फोडू शकला नाही. त्याला कुलदीप यादवने झेलबाद केले. सध्या १३ षटकानंतर राजस्थान संघाने दोन बाद १२३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बटलर ५४ आणि पराग ६ धावांवर खेळत आहे.