Yashasvi Jaiswal, KKR vs RR:  आयपीएलच्या १६व्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या तुफानी फलंदाजीने वर्चस्व गाजवले आहे. यशस्वीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अवघ्या १३ चेंडूत अर्धशतक ठोकून खळबळ उडवून दिली. यशस्वी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. पन्नास धावा करूनही यशस्वी थांबला नाही. यानंतर त्याने झपाट्याने शतकाकडे वाटचाल केली. मात्र, त्याचे शतक पूर्ण करण्यात केवळ दोन धाव हुकली. काही लोक संजूला प्रश्न विचारत आहेत की जर तो थोडा हळू खेळला असता किंवा अधिक संधी दिल्या असत्या तर यशस्वीला शंभरचा आकडा गाठला असता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशस्वी म्हणाला, “मला वाटतं हे एका सामन्यात घडतं. यापेक्षा आणखी चांगले करण्याची जबाबदारी संघावर आली आहे. संजू भाई आले आणि मला म्हणाले की, तुझा नैसर्गिक खेळ खेळत राहा आणि त्या रनआउटचा विचार करू नको.” पुढे तो म्हणाला की, “मला वाटते की संघाचा नेट रन रेट वाढावा हे माझ्या डोक्यात होते. मी आणि संजू भाई (संजू सॅमसन) फक्त खेळ लवकर संपवण्याबद्दल बोलत होतो.”

आम्ही यावेळी ट्रॉफी नक्की जिंकणार- यशस्वी

यशस्वी जैस्वालला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. यावेळी त्याने एक मुलाखत दिली. माझ्या मनात नेहमी चांगला खेळ करणे हेच असते. “ माझं डोक्यात आता फक्त मागीच्या वेळी हुकलेली आयपीएलची ट्रॉफी संघाला जिंकवून देणे एवढेच आहे. प्ले ऑफ मध्ये कोणता संघ येईल हे मी नाही सांगू शकत पण आम्ही नक्की असू.” असे म्हणत त्याने इतर संघाला इशारा दिला आहे.

राजस्थानकडून यशस्वीने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ५ षटकार मारले. यादरम्यान यशस्वीला शतक पूर्ण करण्याची संधी होती, पण यादरम्यान राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनही आक्रमक खेळत होता. यशस्वी ८८ धावांवर असताना आणि राजस्थानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. त्यावेळी संजूने ११.३ षटकांत वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. त्यामुळे षटक संपेपर्यंत राजस्थान विजयापासून अवघ्या १० धावांनी मागे पडला.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal: “मला शतक करायचचं नव्हत…” सर्वात वेगवान अर्धशतक झळकावल्यानंतर यशस्वी शतकाचा नव्हे तर कशाचा विचार करत होता?

त्याचवेळी, ११व्या षटकाच्या अखेरीस यशस्वीने ८९ धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर संजू सॅमसनने यशस्वी जैस्वालचे शतक पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पण शेवटी तो केवळ दोन धावांनी हुकला. राजस्थानकडून संजू सॅमसनने २९ चेंडूत ४८ धावांची खेळी केली, ज्यात त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashasvi jaiswal i just want to win the ipl trophy in my head yashasvis big statement ahead of the play offs avw
Show comments