Yashasvi Jaiswal Statement On MS Dhoni, Virat Kohli And Rohit Sharma : भारताचा युवा क्रिकेटर यशस्वी जैस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात ४७ चेंडूत नाबाद ९८ धावा कुटल्या. फक्त १३ चेंडूत अर्धशतक झळकावत जैस्वालने आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं. सामना संपल्यानंतर जैस्वालने म्हटलं, माझ्या छोट्याशा करिअरमधील ही सर्वात आवडती इनिंग आहे. जैस्वालच्या या जबरदस्त इनिंगच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात ९ विकेट्सने विजय मिळवला.
जैस्वालने सामना संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, ही इनिंग कायम स्मरणात राहील. मी एक चांगली इनिंग खेळलो. जेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा मला वाटलं, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. त्यानंतर अचानक मला वाटलं, की सगळं काठी ठीक सुरु आहे. मी अशाप्रकारे फलंदाजी केली पाहिजे, असं मी त्यावेळी ठरवलं. ही इनिंग कायम लक्षात राहिल.
जैस्वाल पुढे म्हणाला, “माझा दिनक्रम आणि रोजची काम करण्याची पद्धत खूप कठीण आहे. यामध्ये असणाऱ्या नियमांचं मी पालन करतो. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. मी एकाग्रता टीकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि प्रत्येत सामन्यातून काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मी माझ्या इनिंगला पुढे नेत असतो, तेव्हा या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. २० षटक क्षेत्ररक्षण केल्यानंतर तुम्हाला इनिंगची सुरुवात करण्यासाठी जावं लागतं.
त्यामुळे स्वत:ला फिट आणि मानसिकरित्या मजबूत ठेवतो. यामुळे माझा आत्नविश्वास वाढण्यास मदत मिळते. जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू महेंद्र सिंग धोनी यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आसपास खूप अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आहेत. मला जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जोस बटलर, संजू सॅमसन या दिग्गज खेळाडूंसोबत चर्चा करतो. मी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतो.”