Virender Sehwag on Sanjeev Goenka : एलएसजीचे मालक संजीव गोयंका आयपीएल २०२४ दरम्यान अडचणीत आले आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दारुण पराभवानंतर मालक संजीव गोयंका यांची कर्णधार केएल राहुलला रागाने काही तरी बोलताना दिसले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने अवघ्या ९.४ षटकात विजय मिळवून दिल्याने लखनऊ संघाला १० विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे संजीव गोयंका आपल्या संघाच्या कामगिरीवर खूश नव्हते आणि ते राहुल आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्याशी कठोर शब्दात बोलताना दिसले. यावर आता वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने क्रिकेट वेबसाइट क्रिकबझशी बोलताना संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. वीरेंद्र सेहवाग म्हणाला, मालक सुरुवातील पैसे गुंतवतात, पण नंतर काहीही न करता ४०० कोटी रुपये कमावतात. असे असूनही त्यांचे वर्तन चांगले नाही. यापूर्वी मोहम्मद शमीनेही एलएसजी संघाचे मालक संजीव गोयंकावर सडकडून टीका केली आहे. तो म्हणाला की संघ कसाही खेळला तरी मालक नेहमीच नफा कमावतात.

प्रशिक्षक आणि कर्णधार संघ चालवतात –

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “संघ मालकाची भूमिका अशी असली पाहिजे की, जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये किंवा पत्रकार परिषदेदरम्यान खेळाडूंना भेटतो, तेव्हा त्याने केवळ प्रेरणादायक गोष्टी बोलल्या पाहिजेत. पण जर मालक आला आणि म्हणाला काय चालले आहे? काय अडचण आहे? किंवा जर त्याने व्यवस्थापनातील एखाद्याला पकडले आणि एखाद्या विशिष्ट खेळाडूबद्दल प्रश्न उपस्थित करणे सुरू केले, तर ते योग्य नाही. पहा, प्रशिक्षक आणि कर्णधार संघ चालवतात. त्यामुळे या मालकांनी खेळाडूंशी पंगा न घेणे, रागावणे हेच बरे होईल.”

हेही वाचा – RCB vs DC : लाइव्ह मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद, जाणून घ्या काय होतं नेमकं कारण?

काहीही झाले तरी संघ मालकांना ४०० कोटीचा फायदा होतो –

तीन हंगामात पंजाब किंग्जचा मार्गदर्शक राहिलेला वीरेंद्र सेहवाग संजीव गोयंकाला फटकारताना म्हणाला, ”हे सर्व उद्योगपती आहेत. त्यांना फक्त नफा-तोटा समजतो. पण इथे काहीही नुकसान नाही. मग अडचण काय आहे? तुम्हाला ४०० कोटी रुपयांचा नफा मिळत आहे. अर्थात, हा असा व्यवसाय आहे, जिथे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुमची काळजी घेणारे लोक आहेत. तसेच इथे काहीही झाले तरी तुम्हाला फायदाच होत आहे. त्यामुळे तुमचे काम फक्त खेळाडूंना प्रेरित करणे हे असले पाहिजे.”

हेही वाचा – RCB vs DC : रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने नोंदवला सलग पाचवा विजय, ४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा

वीरेंद्र सेहवागने पंजाब किंग्जला मारला टोमणा –

वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “अशा वर्तनामुळे काय होते की, खेळाडूला वाटते की आयपीएलमध्ये इतरही फ्रँचायझी आहेत, मी येथून गेलो तर दुसरे कोणीतरी मला विकत घेईल. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे एखादा खेळाडू गमावला, तर तुमची जिंकण्याची शक्यता शून्यावर जाते. मी पंजाब संघ सोडला, तेव्हा तो पाचव्या क्रमांकावर होता. त्यानंतर इतर कोणत्याही हंगामात तो पाचव्या क्रमांकावर आला नाही.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youre earning a 400 crore profit virender sehwag slams sanjiv goenka for verbal outburst kl rahul and preity zinta vbm