Yuzvendra Chahal breaks Lasith Malinga’s record: आयपीएलच्या १६व्या हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स खेळला गेला आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला होता. पंजाब किंग्जने शिखर धवनच्या नाबाद ८६ धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी ४ बाद १९७ धावा केल्या. दरम्यान या सामन्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातील १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जितेश शर्माला बाद करत युजवेंद्र चहलने विक्रम रचला. या विकेटच्या जोरावर त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. लसिथ मलिंगाच्या नावार १७० विकेट्सची नोंद आहे. परंतु आता युजवेंद्र चहलने १७१ विकेट्सची नोंद करत मलिंगाला मागे टाकले आहे. या यादीत ड्वेन ब्राव्हो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १६१ सामन्यात १८३ विकेट्स घेतल्या आहेत.

चहलची टी-२० गोलंदाजीमधील आकडेवारी –

युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये १३३ सामन्यांमध्ये १७१ विकेट घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७५ सामन्यांमध्ये ९१ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्ये ४२ विकेट घेतल्या आहेत. चहलने २६६ टी-२० सामन्यांमध्ये जवळपास २४ च्या सरासरीने आणि ७.५च्या इकॉनॉमीने ३०१ बळी पूर्ण केले आहेत. यादरम्यान, त्याने ५ वेळा एका डावात चार विकेट्स आणि २ वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १८.८ आहे.

टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज –

युजवेंद्र चहलने भारताकडून टी-२० फॉरमॅटमध्ये ३०१ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर रविचंद्रन अश्विन २८८ विकेट्ससह टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. याचबरोबर पियुष चावला २७६ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. अमित मिश्रा २७२ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार २५६ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहेत.