Yuzvendra Chahal breaks Shane Warne’s record : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २४ वा सामना १० एप्रिल रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने संजू सॅमसनच्या राजस्थानचा ३ विकेट्सनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील राजस्थानचा हा पहिला पराभव ठरला. या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने शेन वॉर्नचा विक्रम मोडत खास पराक्रम केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजवेंद्र चहलने मोडला शेन वार्नचा १३ वर्षे जुना विक्रम –

स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल आयपीएलच्या १७व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत, चहलने या हंगामात चांगली गोलंदाजी करताना ज्यामध्ये त्याने ५ सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने गुजरातविरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ४३ धावा दिल्या पण २ विकेट्सही आपल्या नावावर केल्या. यासह चहलने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा १३ वर्षे जुना विक्रमही मोडला.

चहल राजस्थानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला –

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात २ विकेट्स घेत युजवेंद्र चहल आता आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चहल २०२२ च्या आयपीएल हंगामात राजस्थान संघाचा भाग बनला, तेव्हापासून त्याने ३६ सामने खेळताना राजस्थानसाठी ५८ विकेट्स घेतल्या आहेत. तर २००८ ते २०११ या काळात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून खेळलेल्या शेन वॉर्नने ५५ सामन्यात ५७ विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या सिद्धार्थ त्रिवेदीच्या नावावर आहे ज्याने ७६ सामन्यांमध्ये ६५ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर शेन वॉटसनचे नाव आहे, ज्याने ७८ सामन्यात ६१ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?

चहल २०० विकेट्सपासून फक्त ३ पावले दूर –

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत युजवेंद्र चहल सध्या पहिल्या स्थानावर आहे. त्याने १५० सामने खेळताना २१.२५ च्या सरासरीने १९७ विकेट्स घेतल्या आहेत. आता चहल आयपीएलमध्ये २०० विकेट्स पूर्ण करण्याच्या आकड्यापासून फक्त ३ पावले दूर आहे. चहल जर ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर तो आयपीएलमध्ये हा इतिहास रचणारा पहिला खेळाडूही ठरेल. राजस्थान रॉयल्स संघाला या हंगामात आपला पुढचा सामना १३ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचा आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuzvendra chahal breaks warnes 13 year old record to become third highest wicket taker for rajasthan royals in ipl 2024 vbm