Yuzvendra Chahal IPL Auction 2025: IPL 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी जेद्दाहमध्ये भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलला विकत घेण्यासाठी जोरदार चढाओढ झाली. गुजरातने ३४ वर्षीय चहलसाठी पहिली बोली लावली आणि त्यानंतर चेन्नईनेही यात सहभाग घेतला. दरम्यान, बोली १४ कोटींच्या पुढे गेली. चहलवरील बोली सातत्याने वाढत होती. यादरम्यान पंजाब किंग्जने १८ कोटींची बोली लावली आणि चहलला आपल्या संघात समाविष्ट केले. मेगा लिलावात चहलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. १२ मार्की खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होता.

हेही वाचा – Rishabh Pant IPL Mega Auction 2025: ऋषभ पंतसाठी लखनौची विक्रमी बोली, अय्यरला मागे टाकत काही मिनिटात ठरला सर्वात महागडा खेळा

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

१८ कोटींइतक्या मोठ्या किंमतीला खरेदी करण्यात आलेला युझवेंद्र चहल हा पहिला भारतीय फिरकीपटू ठरला आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहल राजस्थानने रिलीज केल्यामुळे लिलावाचा भाग होता. चहल हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने १६० आयपीएल सामन्यात २०८ विकेट घेतल्या आहेत. या लीगमध्ये २०० हून अधिक विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. चहल आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींकडून खेळला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Shreyas Iyer IPL 2025 Auction: २६.७५ कोटी! श्रेयस अय्यर ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्सने लावली तगडी बोली

युझवेंद्र चहलने २०१३ मध्ये आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पुढच्याच मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीमध्ये सामील झाला. तो २०१४ ते २०२१ पर्यंत आरसीबीमध्ये राहिला आणि त्याने भरपूर विकेट घेतल्या पण एकदाही त्याला विजेतेपद मिळवता आले नाही. यानंतर तो आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाला, जिथे तो २०२४ पर्यंत कायम होता. पण आता चहलचा पंजाब किंग्सबरोबर नवा प्रवास सुरू होणार आहे.

Story img Loader